महावेध कधी घेणार अचूक हवामानाचा वेध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:10 PM2018-01-06T23:10:32+5:302018-01-06T23:10:55+5:30

शेतकऱ्यांना दर १० मिनिटांनी हवामानाची अचूक माहिती व त्या अनुषंगाने हवामानविषयक सल्ला देण्यासाठी एप्रिल २०१७ पासून जिल्ह्यातील ८९ महसूल मंडळांत स्वंयचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

When will Mahavedh get accurate weather watch? | महावेध कधी घेणार अचूक हवामानाचा वेध?

महावेध कधी घेणार अचूक हवामानाचा वेध?

Next
ठळक मुद्दे८९ केंद्रे कार्र्यान्वित : मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनासाठी रखडली यंत्रणा

गजानन मोहोड।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शेतकऱ्यांना दर १० मिनिटांनी हवामानाची अचूक माहिती व त्या अनुषंगाने हवामानविषयक सल्ला देण्यासाठी एप्रिल २०१७ पासून जिल्ह्यातील ८९ महसूल मंडळांत स्वंयचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या महावेध प्रकल्पासाठी ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस’ या कंपनीसोबत शासनाचा ७ वर्षांचा सेवा करार झाला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाअभावी प्रकल्प खोळंबल्याने मोफतचा सल्ला मिळण्यासाठी शेतकºयांना किमान महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शेतीमध्ये अलीकडे प्रगत तंत्राचा वापर वाढतो आहे. बदलत्या हवामानासोबत जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाद्वारा माहिती दिली जाते. मात्र, ती पुरेशी व गावपातळीची नसते. यामुळे शेतकऱ्यांना दर १० मिनिटाला गावनिहाय हवामान स्थितीची माहिती व्हावी, यासाठी शासनाद्वारा ‘महावेध’ प्रकल्प साकारण्यात येऊन‘स्कॉयमेट वेदर कंपनी’सोबत ७ वर्षांचा करार करण्यात आला. त्या अनुषंगाने प्रत्येक महसूल मंडळात स्वंयचलित हवामान केंद्र सुरू करण्यासाठी महसूल विभागाने जागा उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यातील ८९ महसूल मंडळांत ही स्वंयचलित हवामान केंद्र सुरू झालीत. याचा डाटा पुण्याच्या सर्व्हरला पाठविण्यात येत असला तरी तालुक्यांना व कृषी विभागाला मात्र पाठविलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाशिवाय या प्रकल्पाची सेवा सुरू होणार नाही. त्यामुळे सात वर्षांच्या करारारातील एक वर्षाचा कालावधी वाया गेल्याचे वास्तव आहे.
राज्यातील २०६५ स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारा दर १० मिनिटांनी पुण्यातील सर्व्हरला माहिती पाठविण्यात येणार आहे व नंतर ती जिल्हा व तालुक्याला पाठविण्यात येईल. यासाठी लॉग इन आयडी व पासवर्ड स्कॉयमेटद्वारा संबंधितांना देण्यात येणार आहे. एसएमएसद्वारे ती शेतकऱ्यांनाही पाठविण्यात येईल. मात्र, नऊ महिन्यांपासून महावेधद्वारा अचूक हवामानाचा वेध देण्यात आलेला नाही, हेच वास्तव आहे.
दर १० मिनिटाला या घटकांची नोंद
या स्वयंचलित हवामान केंद्रांत तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाºयांचा वेग आणि दिशा या हवामान घटकांची दर १० मिनिटांनी माहिती/नोंद लॉगरमध्ये घेतली जाणार आहे. दर तासाभरात ही माहिती पुण्याच्या सर्व्हरला पाठविली जाईल. त्यानंतर जिल्हा व तालुक्याला पाठविली जाईल. या माहितीच्या आधारे पीकविमा व इतर जनसुविधा सोईस्कर होणार आहे.
२६ जानेवारीला ‘महावेध’चे उद्घाटन
शेतकऱ्यांना दररोज हवामानाची माहिती एसएमएसद्वारे मिळावी, यासाठी जिल्हातील ८९ व राज्यातील २०६५ महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. मात्र, उद्घाटनाअभावी सेवा अद्याप सुरू झालेली नाही. २६ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सेवेचे उद्घाटन करतील, त्यानंतरच ही सुविधा आगामी ७ वर्षे स्कॉयमेट वेदर सर्व्हिसद्वारे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी ‘स्कॉयमेट’चे अ‍ॅप
शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज दर १० मिनिटांनी मिळावा, यासाठी महावेध प्रकल्पाची केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात सेवा सुरू झालेली नाही. स्कॉयमेट वेदर सर्व्हिसद्वारा शेतकऱ्यांसाठी वेदर अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. याद्वारेही शेतकºयांना हवामानाची माहिती मिळू शकते, असे सेवा पुरविणाऱ्या संस्थेने सांगितले.


राज्यात २०६५ मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित आहेत. दर १० मिनिटांनी हवामानाचा डाटा पुण्याच्या सर्व्हरला पाठविण्यात येत आहे. येत्या २६ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवेचे उद्घाटन होऊन शेतकऱ्यांना हवामानाचा संदेश देण्यात येईल.
- भूषण रिनके,
विदर्भ व्यवस्थापक, महावेध

Web Title: When will Mahavedh get accurate weather watch?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.