ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट, मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:57+5:302021-09-02T04:26:57+5:30
प्रवाशांचा प्रतिसाद अल्प; ११५ बसेस पैकी ३७ फेऱ्याच मुक्कामी अमरावती : कोरोना संसर्गामुळे थांबलेली एसटी बसची चाके पुन्हा कोविड-१९ ...
प्रवाशांचा प्रतिसाद अल्प; ११५ बसेस पैकी ३७ फेऱ्याच मुक्कामी
अमरावती : कोरोना संसर्गामुळे थांबलेली एसटी बसची चाके पुन्हा कोविड-१९ ची दुसरी लाट ओसरल्यानंतर धावू लागल्या आहेत. एसटी बसेस पूर्ण क्षमतेने धावत असल्या तरी ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद ५० ते ६० टक्के मिळत आहे. परिणामी विभागात ११५ मुक्कामी बसपैकी केवळ ३७ फेऱ्याच आजघडीला सुरू आहेत. ज्या ठिकाणी मुक्कामी गाड्या जायच्या त्या गावातील प्रवाशांना मात्र गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांनाही मुक्कामी बस कधी सुरू होईल, याची प्रतीक्षा लागली आहे.
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे ८ एसटी आगार आहेत. यातील सर्वच आगारातून ग्रामीण भागात रात्री मुक्कामी बसेस खेडेगावात सोडल्या जातात. महामंडळाकडून बसेस सोडण्याची तयारी असली तरी बसेला पाहिजे तसा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत नाही. यामुळे महामंडळाचा इंधनाचा खर्चही वसूल होत नाही. आर्थिक नुकसान होत असल्यामुळे ग्रामीण भागातील अद्यापही ७७ मुक्कामी फेऱ्या बंद आहेत. मुक्कामीे बस बंद असल्याने या गाड्या कधी सुरू होतील, याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे.
बॉक्स
शहर भागात गाड्या अधिक
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर विभागातून मध्यम व लांबपल्ल्याच्या तसेच जिल्हांतर्गत शहरी भागात धावणाऱ्या एसटी बसेसना प्रवाशाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी प्रवाशामुळे बसेसही हाऊसफुल्ल भरून धावत आहेत.
बाॅक्स
मुक्कामी गाड्यांचे काय?
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातून तसेच दर्यापूर, बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आगारातून सध्या ११५ पैकी ३७ मुक्कामी बसेस जात आहेत. ७७ मुक्कामी बसेस केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॉक़्स
ग्रामीण भागातील गाड्यांना थंड प्रतिसाद
एसटी महामंडळाकडून ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या बसेस मध्ये ५० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. यात खर्च वसूल होत नाही. याशिवाय अनेक ठिकाणी मुक्कामी बसेसला थांबण्यासाठी जागाही मिळत नाही.
कोट
आमच्या गावात अगोदर एसटी बस मुक्कामी यायची मात्र कोरोनापासून ही बस बंद आहे. त्यामुळे कामासाठी बाहेरगावी जायचे असल्यास खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुक्कामी बस आता सुरू करणे आवश्यक आहे.
- राजेंद्र कावरे, प्रवासी
कोट
कोरोनामुळे बसेस बंद होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. शासनाने निर्बंधही शिथिल केले आहेत. त्यामुळे मुक्कामी बसेसही सुरू कराव्यात, सणासुदीचे दिवस तोंडावर असल्याने बस सुरू होणे गरजेचे आहे.
कोट
ग्रामीण भागात मुक्कामी जाणाऱ्या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद ५० ते ६० टक्केच आहे. ज्या ठिकाणी प्रवासी प्रतिसाद आहे. अशा बस सुरू केल्या आहेत. उर्वरित मुक्कामी बस आगामी सणाचे दिवस लक्षात घेता टप्याटप्याने सुरू केल्या जातील.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक