चांदुरात कुठे आहे कोरोना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:02+5:30
आज दीड महिना उलटूनही राज्यात कोरोना विषाणूंचा कहर थांबता थांबेना, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. परंतु आजघडीला एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात नसल्याने चांदूरबाजार तालुक्याला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही प्रमाणात प्रतिष्ठाने सुरू करण्याच्या संदर्भात मुभा दिली आहे. यात तालुक्यात मुभा देण्यात आलेले व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी देशात २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीला उपविभागीय अधिकारी यांनी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. या शिथिलतेचा गैरफायदा घेत शेकडो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केल्याने संचारबंदीचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मात्र, याकडे पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे.
आज दीड महिना उलटूनही राज्यात कोरोना विषाणूंचा कहर थांबता थांबेना, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. परंतु आजघडीला एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात नसल्याने चांदूरबाजार तालुक्याला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही प्रमाणात प्रतिष्ठाने सुरू करण्याच्या संदर्भात मुभा दिली आहे. यात तालुक्यात मुभा देण्यात आलेले व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याचा गैरफायदा घेत अनेक दुकानदार सर्रास दुकाने उघडून फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करता व्यवसाय करीत आहते, तर ग्राहकसुद्धा विनामास्कने सर्रास वावरत असून, संचारबंदीचा सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.
जिल्ह्यासह राज्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसला तरी शहरातील बाजारपेठेत वाढत असलेली गर्दी पाहता पालिका प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई केली जात नाही. नागरिकसुद्धा बेजबाबदार झाल्याचे चित्र दिसत आहे. बाजारपेठेत सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतेपर्यंत बाजारात तुफान गर्दी पहावयास मिळत आहे. यामुळे संचारबंदी संपुष्टात आली काय, असा सवाल अनेक नागरिक उपस्थित करीत आहे. काही व्यवसायिकांना अटी व शर्तीच्या अधीन राहून ६ मे पासून व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली. यात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गल्ली बोळीतील दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, मुख्य बाजारपेठेत अनेक दुकाने उघडली.
संचारबंदीत अतिक्रमणही
या दुकानांवर होणाºया गर्दीमुळे संचारबंदीचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरात भरणाºया भाजीपाला दुकाने व फळाच्या गाड्या मनात येईल तेथे उभ्या करून दुकाने थाटली जात आहे. यामुळे बाजारात सगळीकडे गर्दीच गर्दी झाली असून, कोरोनाचा शिरकाव दबक्या पायाने तालुक्यात तर होणार नाही ना? अशी शंका स्थानिक नागरिकांतर्फे व्यक्त केली जात आहे. काही दुकानदारांनी कमाईच्या लालसेपोटी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. यात फिजिकल डिस्टन्सिंग कुठेही दिसून येत नाही. पोरांना विषाणूचा संसर्ग अद्यापही टळलेला नाही. असे असतानाही शहरात होत असलेली गर्दी या जीवघेण्या विषाणूला आमंत्रण देणारी ठरत आहे. संचारबंदीचे होत असलेले उल्लंघन पाहून खरेच शासनाने सवलत देऊन चूक तर केली नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असले तरी गर्दी आटोक्यात आणणे सध्या तरी गरजेचे झाले आहे.