‘ट्रायबल’च्या संंशोधन अधिकारी परीक्षेच्या निकाल अडला कुठे?

By गणेश वासनिक | Published: June 12, 2023 04:25 PM2023-06-12T16:25:32+5:302023-06-12T16:25:45+5:30

सहा महिने लोटून गेले; वर्षानुवर्षे पदे रिक्तच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विलंब

Where is the result of 'Tribal's research officer exam? | ‘ट्रायबल’च्या संंशोधन अधिकारी परीक्षेच्या निकाल अडला कुठे?

‘ट्रायबल’च्या संंशोधन अधिकारी परीक्षेच्या निकाल अडला कुठे?

googlenewsNext

अमरावती : आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट- अ, (श्रेणी-२) या पदांची परीक्षा होऊन सहा महिने लोटून गेले तरी अद्यापपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलेला नाहीत.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालयातील वरिष्ठ संशोधक अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी सन २०२० मध्येच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परीक्षा मात्र त्यानंतर दोन वर्षांनी झाली. वास्तविक पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा प्रणालीमध्ये पारदर्शकता, अचूकता व विहित वेळेत निकाल व पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी संगणक प्रणालीवर आधारित ऑनलाइन चाळणीद्वारे परीक्षा घेऊन परीक्षा प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल केलेला आहेत. ज्या उद्देशाने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तिचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना जमाती प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेला विलंब लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास विभाग मंत्री, सचिव लोकसेवा आयोग यांना वरिष्ठ संशोधक अधिकारी गट-अ या पदांचा निकाल लवकर लागून रिक्त पदे भरण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
-ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक-अध्यक्ष, ट्रायबल फोरम महाराष्ट्र.

Web Title: Where is the result of 'Tribal's research officer exam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.