शिवकुमार, रेड्डी यांची ‘आयपीएस’कडून प्राथमिक चौकशी अडली कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:12 AM2021-04-17T04:12:25+5:302021-04-17T04:12:25+5:30

अपर पोलीस महासंचालकांना वेळ मिळेना, वनमंत्रालयाने दिलेल्या जबाबदारीची दखल नाहीच अमरावती : मेळघाटच्या हरिसाल येथील दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी ...

Where is the preliminary inquiry of Shivkumar and Reddy from IPS? | शिवकुमार, रेड्डी यांची ‘आयपीएस’कडून प्राथमिक चौकशी अडली कुठे?

शिवकुमार, रेड्डी यांची ‘आयपीएस’कडून प्राथमिक चौकशी अडली कुठे?

Next

अपर पोलीस महासंचालकांना वेळ मिळेना, वनमंत्रालयाने दिलेल्या जबाबदारीची दखल नाहीच

अमरावती : मेळघाटच्या हरिसाल येथील दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी प्राथमिक चौकशीची जबाबदारी राज्याच्या अपर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्याकडे वनमंत्रालयाने सोपविली. मात्र, १५ दिवसांनंतरही ना प्राथमिक चौकशी, ना भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांचा दौरा आहे. त्यामुळे दीपाली आत्महत्या प्रकरणातील विनोद शिवकुमार व एम.एस.रेड्डी यांचा बचाव करण्यासाठी प्राथमिक चौकशी अडविली तर होत नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.

राज्याच्या वनमंत्रालयाचे मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी ३१ मार्च २०२१ रोजी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याची जबाबदारी भाप्रसे प्रज्ञा सरवदे यांच्याकडे साेपविली आहे.? या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करुन ३० एप्रिलपर्यंत अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे.? महसूल व वनविभागाने यासंदर्भात चौकशीचे पत्र जारी केले आहे. १५ दिवस उलटले. मात्र, आयपीएस असलेल्या प्रज्ञा सरवदे यांनी दीपाली आत्महत्या प्रकरणी मेळघाट अथवा अमरावती येथे चौकशीसाठी येवू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.? दीपाली यांनी २५ मार्च रोजी गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी गुगामलचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे कारणीभूत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचेविरूद्ध धारणी पोलिसांत गुन्हा नोंद क्रमांक ०२११/२०२१ नुसार भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.? तसेच शिवकुमार याचे २६ मार्च रोजी निलंबन झाले आहे.? दीपालीच्या यांच्या सुसाईड नोटमध्ये शिवकुमार याच्याकडून मानसिक छळ होत असल्याची बाब अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या निदर्शनास वेळोवळी आणून दिली होती. परंतु, रेड्डी यांनी वेळीच दखल घेत कार्यवाही केली नाही, असे शासनाच्या पत्रात नमूद आहे.? त्यामुळे आयपीएसकडून होणाऱ्या प्राथमिक चौकशीचा अहवाल महत्वपूर्ण ठरणार आहे.?

------------अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांना दीपाली आत्महत्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करावयाची आहे. ही चौकशी त्या मुंबई येथून सुद्धा करू शकतात. त्या अमरावतीत चौकशीसाठी येणार आहे अथवा नाही, हे मी सांगू शकत नाही. मात्र, आयपीएस सरवदे यांना चौकशीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी वरिष्ठांचे आदेश प्राप्त आहेत.

- चंद्रकिशोर मीणा,

विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती

Web Title: Where is the preliminary inquiry of Shivkumar and Reddy from IPS?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.