कुठे कडकडीत, कुठे संमिश्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:01:11+5:30
संचारबंदीच्या काळात दूध विक्री केंद्रे, डेअरी सकाळी सहा ते दहा या वेळेत उघडली. सर्व आरोग्य सेवा, औषधविक्री दुकाने पूर्णवेळ उघडी आहेत. एमआयडीसीतील उद्योग, वीज सेवा, गॅस सेवा, यंत्रणांनी मान्सूनपूर्व करावयाची कामे आदी सुरू आहेत. या कालावधीत वृत्तपत्रसेवा (विक्री व वितरण) सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. जिल्हाभरात सर्व पेट्रोल पंप सुरू असले तरी संचारबंदीमुळे येथे शुकशुकाट होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गाला ‘ब्रेक’ लावण्यासाठी जारी करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या संचारबंदीला अमरावती शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कालावधीत सूट दिलेल्या सेवा वगळता सर्व मार्केट, दुकाने व आस्थापना बंद राहिल्या. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कुठे-कुठे पोलिसांचा दंडुकाही चालला.
संचारबंदीच्या काळात दूध विक्री केंद्रे, डेअरी सकाळी सहा ते दहा या वेळेत उघडली. सर्व आरोग्य सेवा, औषधविक्री दुकाने पूर्णवेळ उघडी आहेत. एमआयडीसीतील उद्योग, वीज सेवा, गॅस सेवा, यंत्रणांनी मान्सूनपूर्व करावयाची कामे आदी सुरू आहेत. या कालावधीत वृत्तपत्रसेवा (विक्री व वितरण) सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. जिल्हाभरात सर्व पेट्रोल पंप सुरू असले तरी संचारबंदीमुळे येथे शुकशुकाट होता.
शनिवार व रविवार या दोन दिवसांसाठी महापालिकेच्या क्षेत्रात पालिका आयुक्त, तालुके व इतर शहरांत मुख्याधिकारी व तहसीलदार यांच्याकडून प्रभावी अंमलबजावणी होत आहे. दोन दिवसांपासून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्तांसह जिल्हा पोलीस अधीक्षक संचारबंदीबाबत गंभीर असल्याचे चौकाचौकांतील बंदोबस्तावरून दिसून आले.
मॉर्निंग वॉकर्सला परतविले
संचारबंदीचा विसर पडल्याने शहरात अनेक ठिकाणी मॉर्निंग वॉकर्स फिरावयास निघाले. मात्र, पोलीस यंत्रणेला याची माहिती अगोदर असल्याने त्यांना मध्येच परत पाठविण्यात आले. संचारबंदीत विनाकारण फिरणाºया युवकांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. काहींनी अत्यावश्यक कारणे सांगितली. त्यांच्याकडून पोलिसांनी खातरजमा करून घेतली. शहरात प्रवेश घेणाºया चारचाकी वाहनांना सीमेवरच रोखण्यात आले. या सर्व वाहनांची तपासणीदेखील पोलिसांनी केली.
बडनेरा कडकडीत बंद
शहराने ११ जुलै रोजी कोरोनाग्रस्तांच्या संख्येची शंभरी गाठली आहे. दरम्यान कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी दोन दिवसांच्या संचारबंदीत शनिवारी बडनेरा शहर कडकडीत बंद होते. महामार्गावरील यवतमाळ टी-पॉर्इंट व अलमास गेटजवळ वाहतूक शाखेने नाकाबंदी केली. यावेळी ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बडनेरा पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन करणाºया पानटपरी व आॅटोचालकावर गुन्हे दाखल केले आहेत. यादरम्यान विनाकारण दुचाकीने फिरणाºयांची संख्या बरीच होती. संचारबंदी हाताळण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी फिक्स पॉर्इंट लावले आहेत.