कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांनी जावे कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:14 AM2021-04-28T04:14:09+5:302021-04-28T04:14:09+5:30

अमरावती : जिल्ह्यात जानेवारीनंतर कोरोना संसर्गात वाढ झालेली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रुग्णालये आता कोविड हॉस्पिटल झाली आहेत. त्यामुळे ...

Where should emergency patients without corona go? | कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांनी जावे कोठे?

कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांनी जावे कोठे?

Next

अमरावती : जिल्ह्यात जानेवारीनंतर कोरोना संसर्गात वाढ झालेली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रुग्णालये आता कोविड हॉस्पिटल झाली आहेत. त्यामुळे नॉन-कोविड अत्यवस्थ रुग्णांनी कोठे जावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. काही रुग्णालये उपलब्ध असली तरी कोरोनाकाळात रुग्णांची फरफट होत असल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय नियोजित शस्त्रक्रियादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली होती. त्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या कमी व्हायला लागली व खासगी कोविड सेंटरही पूर्वीप्रमाणे कामे करायला लागली होती. मात्र, दिवाळीनंतर रुग्णसंख्या हळूहळू वाढायला लागली. शहरात जिल्हा सामान्य रुगग्णालय हेच प्रमुख शासकीय रुग्णालय राहिले आहे. याशिवाय चार, पाच छोटेखानी रुग्णालये आहेत. आता फेब्रुबारी महिन्यात संक्रमण चांगलेच वाढायला लागल्याने शहरातील बहुसंख्य प्रमुख रुग्णालये आता कोविड हॉस्पिटल बनली आहेत. त्यामुळे अन्य रुग्णालयांत रुग्णांची हेळसांड होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

पाॅईंटर

शहरातील शासकीय रुग्णालये : ०६

शासकीय कोविड हॉस्पिटल : ०१

खासगी रुग्णालये : २१

खासगी कोविड हॉस्पिटल : २१

बॉक्स

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आजार

जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आधार ठरला आहे. या रुग्णांसाठी येथे ओपीडी चालविली जाते व रुग्ण अत्यवस्थ असल्यास त्याला उपचारार्थ भरतीदेखील केले जाते. मात्र, अनेक खासगी रुग्णालयांचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आल्यामुळे खासगी उपचार हवे असल्यास फरफट होते. असे काही अनुभव असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.

बॉक्स

शहरातील अनेक डॉक्टर करतात कोरोनावर उपचार

मोठ्या कोविड हॉस्पिटलमध्ये शहरातील अनेक डॉक्टर उपचार देत आहेत. त्यामुळे साहाजिकच अन्य आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होते. अनेक शस्त्रक्रियादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, कोरोनाच्या लाटेत नॉन-कोविड रुग्णालये कोणती, हादेखील प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांपुढे उभा ठाकला आहे. कारण आतापर्यत ज्या रुग्णालयात उपचार घेतले. ते आता कोविड हॉस्पिटल झाल्याचे दिसून येते.

कोट

०००००००००

०००००००००००००००

०००००००००००००

Web Title: Where should emergency patients without corona go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.