क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करताना शाळकरी आॅटो उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 09:58 PM2018-09-03T21:58:22+5:302018-09-03T22:00:28+5:30

कॅम्पस्थित एनसीसी कँटिनसमोरील त्रिकोणी बगिच्याजवळ एक शाळकरी आॅटो उलटून आठ विद्यार्थिंनी किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. त्यामुळे आॅटोचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत जीवघेणी कसरत करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

While traveling more than the capacity, schoolgirls overturned | क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करताना शाळकरी आॅटो उलटला

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करताना शाळकरी आॅटो उलटला

Next
ठळक मुद्देजीवघेण्या प्रवासावर अंकुश कधी?एनसीसी कँटीनसमोरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कॅम्पस्थित एनसीसी कँटिनसमोरील त्रिकोणी बगिच्याजवळ एक शाळकरी आॅटो उलटून आठ विद्यार्थिंनी किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. त्यामुळे आॅटोचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत जीवघेणी कसरत करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असून, ही जीवघेणी वाहतूक चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारी ठरत आहे. शनिवारी आॅटो क्रमांक एमएच २७ एएफ-२४४३ मध्ये तब्बल आठ ते नऊ विद्यार्थ्यांना बसवून चालक एनसीसी कँटिनसमोरून चपराशीपुऱ्याकडे जात होता. दरम्यान एका दुचाकीस्वाराने आॅटोला कट मारल्याने चालकाचे संतुलन बिघडून आॅटो पलटी झाला. आतील विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर दबल्याने आरडओरडा सुरू झाला. काही नागरिकांनी तत्काळ आॅटोतील मुलींना बाहेर काढले व आॅटो उभा केला. सुदैवाने आॅटोतील शाळकरी मुलांना किरकोळ दुखापत झाली. अन्यथा आॅटो उलटून अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता होती. याची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना प्राप्त होताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आॅटोचालक बंडू रामदास मोखळे (४५,रा.गजानननगर) याची कानउघाडणी केली. या घटनेची तक्रार झाली नाही, त्यामुळे पोलिसांनीही कारवाई न करता आॅटोचालकास सोडून दिले. मात्र, या घटनेवरून शहरातील आॅटोचालक अतिक्षमतेची प्रवासी वाहतूक करून शाळकरी मुलांच्या जिवाला धोका निर्माण करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
आॅटोचालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत
आॅटो उलटल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. फे्रजरपुरा व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आॅटोचालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे विद्यार्थिनी सांगत होत्या. मात्र, विद्यार्थिनींना काही दुखापत न झाल्याने त्यांनी तक्रार केली नाही आणि पोलिसांनी अधिक चौकशी किंवा वैद्यकीय तपासणी न करता आॅटोचालकास सोडून दिले.
शहर पोलिसांची बघ्याची भूमिका
शहरात अतिक्षमतेची वाहतूक सर्रास सुरू असताना पोलीस बघ्यांचीच भूमिका घेत आहे. चौका-चौकांतून विविध मार्गाने जाणाºया आॅटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सर्वांच्याच दृष्टीस पडते. मात्र, हा गंभीर प्रकार वाहतूक पोलिसांच्या दृष्टीस का पडत नाही, असा सवाल नागरिकांचा आहे. याविषयी अधिकाºयांचे मौन आहे.

आॅटोचालकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डीओला सांगितले होते. या अपघाताची तक्रार नव्हती. त्यामुळे काही कारवाई करण्यात आली नाही.
- आसाराम चोरमले,
पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा

आॅटो पलटी झाल्याविषयीची माहिती माझ्यापर्यंत पोहचलेली नाही. चौकशी केल्यानंतर निश्चित काय ते सांगता येईल.
- रणजित देसाई,
सहायक पोलीस आयुक्त

Web Title: While traveling more than the capacity, schoolgirls overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.