कुजबुज सदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:57+5:302021-07-01T04:10:57+5:30
‘एनर्जेटिक’ व्यक्तिमत्त्वाचे रहस्य लोकप्रतिनिधी चहाला कधीच नकार देत नसतात. दौऱ्याच्या वेळी तर चहा हेेच आवडीचे पेय असते. कारण त्याने ...
‘एनर्जेटिक’ व्यक्तिमत्त्वाचे रहस्य
लोकप्रतिनिधी चहाला कधीच नकार देत नसतात. दौऱ्याच्या वेळी तर चहा हेेच आवडीचे पेय असते. कारण त्याने थकवा पळून जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ‘चाय पे चर्चा’ घेऊन ‘मन की बात’ सुरू केली होती. मात्र, अमरावतीच्या खासदारांना चहा आवडत नाही. त्यांनी दैनंदिन जीवनातही तो वर्ज्य केला आहे. त्या जनमाणसात स्वत:ची ओळख विसरण्याइतपत मिसळणाऱ्या. त्यामुळे कुणीही त्यांना उद्घाटनाला आमंत्रित करणार आणि त्या नकार देणार नाहीत, हे नक्की. पण, बुधवारी त्यांना जयस्तंभ चौकात उद्घाटनाला बोलावले तेच मुळे चहाचे दुकान होते. चहा न घेता त्या येथून निघाल्या तेव्हा त्यांच्या ‘एनर्जेटिक’ व्यक्तिमत्त्वाचे रहस्य हे चहा मुळीच नाही, हे उपस्थितांना कळून चुकले.
- धीरेंद्र चाकोलकर, अमरावती