पांढरे सोने @ ७१००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:15 AM2021-09-11T04:15:09+5:302021-09-11T04:15:09+5:30
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खरेदीचा शुभारंभ : अमरावतीत पांढऱ्या सोन्याला उच्चांकी भाव अमरावती : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अमरावती येथे ...
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खरेदीचा शुभारंभ : अमरावतीत पांढऱ्या सोन्याला उच्चांकी भाव
अमरावती : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अमरावती येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी पांढऱ्या सोन्याला ७१०० रुपयांचा भाव निश्चित करण्यात आला. सागर इंडस्ट्रीजचे सागर पमनानी, राजकुमार पमनानी व अडते नवलकिशोर मालपाणी यांनी कापसाचे विधिवत पूजन करून शेतकऱ्यांचा कापूस घेतला. दरवर्षी याठिकाणी कापसाची पहिली पूजा करून येथून जो भाव निश्चित होतो, त्यानुसारच शेतकरी आपला कापूस बाजारात आणतात, हे विशेष!
शुक्रवारी सकाळी शुभ मुहूर्तावर कापसाची पूजा करण्यात आली. परिसरातील बहुसंख्य शेतकरी यावेळी मुहूर्ताला उपस्थित होते. यावेळी जुबीनसेठ दोटीवाला, मोहनसेठ आहुजा, किशोरभाई शहा, अनील सेठ पमनानी, विजय साहू, कृष्णा मालपाणी, विनोद शर्मा किशोर शहा, नरेश साहू,अबीद भाई, नसरू भाई खरेदीदार, अडते आणी शेतकरी यांची उपस्थिती होती.