पांढरे सोने झाले काळे; कपास पिकावर सावकारांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:41 AM2018-11-27T11:41:19+5:302018-11-27T11:43:42+5:30
चांदूर बाजार तालुक्यात यंदा पावसाने सरासरी गाठली नसली तरी कापसाची स्थिती समाधानकारक आहे. तथापि, अल्प उत्पादन व दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांच्या ‘अच्छे दिन’च्या आशा मावळल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: चांदूर बाजार तालुक्यात यंदा पावसाने सरासरी गाठली नसली तरी कापसाची स्थिती समाधानकारक आहे. खुल्या बाजारात ५००० ते ५५०० रुपयांपर्यंत कापसाला दर मिळत आहे. तथापि, अल्प उत्पादन व दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांच्या ‘अच्छे दिन’च्या आशा मावळल्या आहेत.
तालुक्यात यंदा १७ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा आहे. कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव कमी झालेला जाणवत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादनखर्चाच्या तुलनेत कापसाला कमी दर मिळत असल्याने कपाशीच्या पेऱ्त दिवसेंदिवस घट होत चालली आहे. त्यातच शासनातर्फे खरेदी बंद झाल्याने खासगी व्यापारी व दलाल ठरवतील त्याच भावात शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. तालुक्यात एकही जिनिंग-प्रेसिंग नाही. तालुक्यात कपाशीचे पीक समाधानकारक आहे. तथापि, योग्य दराच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी तूर्तास कापूस घरीच ठेवण्यास पसंती दिली आहे. मागील काही वर्षांपासून कापसावर सावकारांची करडी नजर आहे. काहींनी पेरणीच्या वेळी, मशागतीचा वेळी सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्यामुळे कापसाची स्थिती कितीही चांगली असली तरीही मेहनत करूनही शेतकºयांची झोळी रिकामीच असल्याचे चित्र दिसत आहे.