‘त्या’ भजी विक्रेत्यांना कुणाचा वरदहस्त?

By admin | Published: February 14, 2016 12:19 AM2016-02-14T00:19:11+5:302016-02-14T00:19:11+5:30

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद विश्रामगृहालगत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली.

'Who' are the beggars of bhagas? | ‘त्या’ भजी विक्रेत्यांना कुणाचा वरदहस्त?

‘त्या’ भजी विक्रेत्यांना कुणाचा वरदहस्त?

Next

पाठ फिरविताच ‘दुकानदारी’ : मजीप्रासमोर पुन्हा अतिक्रमण
अमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद विश्रामगृहालगत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली. शुक्रवारी कारवाई केल्यानंतर या भागात शनिवारी सकाळी दुकानदारी थाटली गेली. त्यामुळे शनिवारी पुन्हा कारवाई करण्यात आली. मात्र एका भजी विक्रेत्याला पाठीशी घालण्यात आले. अन्य व्यावसायिकांच्या हातगाड्या व अन्य साहित्य जप्त करून नेल्यानंतर दोन भजी विक्रेत्यांनी मजीप्राच्या संरक्षण भिंतीला लागून दुकाने थाटली. त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.
एकाने टेबलवर भजी रचली तर अन्य एका विक्रेत्याने व्हॅनमधून खाद्यपदार्थ विकले. मजीप्राच्या संरक्षण भिंतीला लागून हे अतिक्रमण थाटण्यात आले.
महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना आपण महिन्याकाठी ६ हजार रुपये देतो, म्हणून कुणीही आपल्याला हात लावू शकत नाही, असा दम ते भजी विक्रेते भरत असल्याची उद्वीग्न प्रतिक्रिया तेथीलच एका ज्युस विक्रेत्याने 'लोकमत'कडे व्यक्त केली.

महापालिकेचा वचकच नाही
मजीप्राच्या शिवटेकडीसमोरील भागात असलेल्या संरक्षण भिंतीच्या पदपथावरील ज्युस विक्रेत्यांचेही अतिक्रमण शुक्रवारी काढण्यात आले. शनिवारी मात्र त्या ज्युस विक्रेत्यांनी पुन्हा आपली दुकानदारी थाटली. त्यामुळे एकतर या अतिक्रमणधारकांवर महापालिकेचा वचक उरलेला नाही.
अतिक्रमणधारक घुटमळतात!
काही विशिष्ट विक्रेत्यांना कारवाईची माहिती देण्यात येते. त्यामुळे हे अतिक्रमणधारक जुजबी साहित्य ठेवतात. त्यावरच कारवाई केली जाते. अतिक्रमणविरोधी पथकाची पाठ फिरताच पुन्हा नव्याने सर्व तयारीनिशी व्यवसाय घाटला जातो. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर असो की नगर वाचनालय, रॉयली प्लॉट असो की बसस्थानक मार्ग सर्वीकडे हाच अनुभव येतो. त्यामुळे विशिष्ठांना ठराविक कालावधीत आर्थिक बिदागी ‘हप्ता’ पोहोचविला जात असल्याच्या आरोपाला बळ मिळते.

मागील अनेक वर्षांपासून लोक मला ओळखतात. आरोप कुणीही करू शकतो. अतिक्रमण पुन्हा थाटले असल्यास कारवाईसाठी पथक पाठवितो.
- गणेश कुत्तरमारे,
प्रमुख - अतिक्रमणविरोधी
पथक महापालिका.

Web Title: 'Who' are the beggars of bhagas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.