कुणाला फुलकोबी, कुणाला अद्रक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 05:00 AM2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:01:17+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरत आहेत. अपक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुक्त चिन्हांची संख्यादेखील आता १९७ पर्यंत पोहचली आहे. अपक्ष उमेदवारांसाठी फुलकोबी, सिमला मिरची, अद्रक, आईस्क्रीम, पाव, बे्रडटोस्ट, कलिंगड आदी प्रकारचे गमतीशीर मुक्त चिन्हे आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती/परतवाडा : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरत आहेत. अपक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुक्त चिन्हांची संख्यादेखील आता १९७ पर्यंत पोहचली आहे. अपक्ष उमेदवारांसाठी फुलकोबी, सिमला मिरची, अद्रक, आईस्क्रीम, पाव, बे्रडटोस्ट, कलिंगड आदी प्रकारचे गमतीशीर मुक्त चिन्हे आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ७ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी व तृणमूल काँग्रेस हे सात राष्ट्रीय पक्ष आहेत. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष राज्य पातळीवरील पक्ष आहेत. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील या सर्व पक्षांना निवडणूक आयोगाने चिन्ह दिले आहेत. या पक्षांच्यावतीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्या-त्या पक्षांचे चिन्ह प्रदान केले जातील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने १९७ मुक्त चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत. पाव बिस्कीट, केक, ब्रेडटोस्ट अशा बेकरी वस्तुंचा देखील चिन्हासाठी वापर केला आहे. चपला बूट, मोजे अशी चिन्हदेखील आयोगाने उपलब्ध करून दिली आहेत.
आईस्क्रीम द्राक्षांचाही समावेश
नरसाळे, तंबू, हेल्मेट, लायटर एसी, सायकल पंप, कॅमेरा, कोट, दरवाजाची घंटी, नरसाळे, हेलिकॉप्टर, कडी, भुईमूग, करणी थापी, सेफ्टी पिन टाचणी, स्पॅनर पाना, तंबू, टायर्स, लोकर व सुई, कपाट, दुर्बीण, कॅन, नारळाची बाग, दरवाजाचे हँडल, ऊस शेतकरी, हेल्मेट, पत्रपेटी, नासपती, जेवणाचे ताट, करवत, स्टेप्लर, भालाफेक, व्हॅक्यूम क्लिनर, सफरचंद, बिस्किट, सिमला मिरची, कलर ट्रे आणि ब्रश, ड्रील मशीन, गॅस सिलिंडर, हॉकी आणि बॉल, लायटर, मटार, प्लेट स्टँड, शाळेचे दप्तर, स्टेथोस्कोप, टीलर, व्हायोलिन, आॅटोरिक्षा, फळा, गालिचा, संगणक, डम्बेल्स, गॅस शेगडी, वाळूचे घड्याळ, लुडो, पेनड्राइव्ह, हंडी, कात्री, स्टुल, टॉफीज, चालण्याची काठी, बेबी वॉकर, मनुष्य व शीडयुक्त नाव, कॅरम बोर्ड, संगणक माऊस, कानातील रिंगा, भेटवस्तू, आइस्क्रीम, जेवणाचा डबा, पेनाची निब ७ किरणांसह, कुकर, शिवणयंत्र, स्टॅम्प्स, चिमटा, भिंतीची खुंटी, फुगा, पेटी, फुलकोबी, खाट, विजेचा खांब, अद्रक, पाणी गरम करण्याचा रॉड, तुतारी वाजवणारा माणूस, पेन स्टँड, पंचिंग मशीन, जहाज, झोपाळा, टूथब्रश, पाकीट, बांगड्या, पाव, सीसीटीव्ही कॅमेरा, क्रेन, लिफाफा, काचेचा पेला, इस्त्री, काडेपेटी, पेन्सिलचा डबा, रेझर, बूट, स्विच बोर्ड, टूथ पेस्ट, अक्रोड, फळांची टोपली, ब्रेड आदी.