हल्ले, हाणामारींना जबाबदार कोण?

By admin | Published: September 5, 2015 12:17 AM2015-09-05T00:17:14+5:302015-09-05T00:17:14+5:30

अचलपूर हे पौराणिक शहर आहे. या भूमीला भगवान श्रीकृष्णाचा पदस्पर्श झाल्याची आख्यायिका आहे.

Who is responsible for the attacks? | हल्ले, हाणामारींना जबाबदार कोण?

हल्ले, हाणामारींना जबाबदार कोण?

Next

एकोप्यास गालबोट : सांस्कृतिक वारसा धुळीस
अमरावती / अचलपूर : अचलपूर हे पौराणिक शहर आहे. या भूमीला भगवान श्रीकृष्णाचा पदस्पर्श झाल्याची आख्यायिका आहे. चक्रधर स्वामींचे येथे काही काळ वास्तव्य असल्याच्या खाणाखूणा आहे. येथे महान योध्दांचा संग्राम झाल्याचीही नोंद इतिहासात आहे. अशा एकोपा दिसणाऱ्या या शहरात १० ते १२ वर्षांपासून संपूर्ण तालुका हादरवणारी एखादी घटना घडते. त्यामुळे सामाजिक एकतेस गालबोट लागते.
रेती तस्कर असलेल्या बारुद गँगने मागील महीन्यात ११ आॅगस्ट रोेजी अमित बटाउवाले (वय २१) याची भर दिवसा हत्या करुन त्याचे वडील मोहन बटाउवाले ह्यांना गंभीर जखमी केले. ही घटना तालुक्यात दहशत निर्माण करण्यासाठी घडविण्यात आली. या पूर्वनियोजीत कट होता असे लोक बोलत आहे. वरिष्ठ पातळीवरुन गुप्तचर विभागामार्फत चौकशी झाल्यास हे सत्य समोर येईल. जुळ्या शहरात अजूनही मटका, जुगार सुरु आहे. दोन्ही शहरे मिळून ५ सट्टाकिंग आहेत. चिरंजीवीलाल, घोयल आदींचे मटका सट्ट्यावर अधिराज्य आहे. जुगार शहरालगतच्या शेतांमध्ये खेळला जात असल्याची माहिती आहे. क्रिकेटची मॅच असो कि लोकसभा, विधानसभा निवडणुका असो येथे खुलेआम सट्टा खेळला जातो. यामध्ये काही बादशाह मानले जाणारे पोलीस रेकॉर्डवरही नाहीत. मध्य प्रदेश जवळ असल्याने गांजाची विक्री सनन गोळी ह्यांची विक्री येथे होत असते. अवैधपणे रॉकेलची विक्री होत असते. अनेक चार चाकी वाहने, तीन चाकी आॅटो रॉकेलवर धावत असतात. ट्रकमध्ये रॉकेल टाकताना पोलिसांनी पकडल्याच्या नोंदी आहेत. शहरात जवळपास प्रत्येक पानखोक्यावर, बहूताशी किराणा दुकानात गुटखा मिळतो. उघड्यावर मांस विक्री होताना दिसते पण या अवैध धंद्यावर अजुनही संबंधीत अधिकाऱ्यांचा अंकुश नाही.
रेती तस्करीचे खापर मंडल अधिकाऱ्यांवर फोडले त्यांना निलंबित केले. पण ज्या तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांवर महसूल विभाग कारवाई करण्यात का कचरत आहे. त्यांचेवर कारवाई झाली नाही जनतेचा महसूल विभागावरुन विश्वास उठेल तहीसलदारांना एखाद्या तक्रारदाराने भेटल्यास ते त्याची तक्रार धड ऐकतही नव्हते
-बाळासाहेब वानखडे, नगरसेवक
अमच्यावर रेती तस्करांनी केलेल्या हल्ल्यास तहसीलदार व उपविभागीय अधिकारीसुध्दा जबाबदार आहेत. त्यांनी रेती तस्करी बंद केली असती तर माझ्या मुलाची हत्या झाली नसती. त्यासाठी या दोघांवरही कारवाई करावी.
- मोहन बटाउवाले,
शेतकरी.

Web Title: Who is responsible for the attacks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.