न्याय मागायचा कुणाला ?

By admin | Published: June 16, 2017 12:12 AM2017-06-16T00:12:05+5:302017-06-16T00:12:05+5:30

जिल्हाधिकारी, पोलीस, आमदार, खासदारांचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने आता न्याय मागायचा तरी कुणाकडे,

Who wants justice? | न्याय मागायचा कुणाला ?

न्याय मागायचा कुणाला ?

Next

शिशूंचे पालक हतबल : उपोषणाला बसणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी, पोलीस, आमदार, खासदारांचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने आता न्याय मागायचा तरी कुणाकडे, असा प्रश्न पीडीएमसीत चुकीच्या औषधोपचाराने मरण पावलेल्या त्या तीन मृत शिशूंच्या पालकांनी उपस्थित केला आहे.
मृत शिशुंचे पालक पूजा आशिष घरडे, माधुरी विक्रम कावरे व शिल्पा दिनेश वेरुळकर यांनी गुरूवारी पत्रपरिषदेतून त्यांची व्यथा माध्यमांसमोर मांडली. न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची त्यांची तयारी आहे. पीडीएमसीतील अधिष्ठाता, डॉक्टर व परिचारिकांंच्या बेजबाबदारपणामुळेच बाळांचा मृत्यू झाला. डॉ. भूषण कट्टा व दोन्ही परिचारिकांप्रमाणेच या घटनेसाठी अधिष्ठाता दिलीप जाणे, बालरोग विभाग प्रमुख राजेन्द्र निस्ताने, डॉ.प्रतिभा काळे व पंकज बारब्दे हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. एनआयसीयूत सेवा देताना आवश्यक ती खबरदारी न घेता डॉक्टरांनी परिचारिकांवर काम सोपविले. परिचारिकेनेही तिच्या कामात हयगय केली. चुकीचे इंजेक्शन दिल्याने बाळांचा मृत्यू झाला. परिचारिकांचे मोबाईल वेडही या घटनेसाठी कारणीभूत असल्याचा आरोेप पालकांनी यावेळी केला. या गंभीर घटनेचे संस्थाध्यक्षांना मात्र अजिबात गांभीर्य नसल्याबद्दल पालकांनी यावेळी खंत व्यक्त केली.

हीच का प्रतिष्ठित डॉक्टरांची माणुसकी ?
वैद्यकीय सेवेला व्यवसाय बनवून अनेक डॉक्टर गलेलठ्ठ झाले आहेत. मात्र, त्यांना गोरगरिब रूग्णांच्या जीविताचीच पर्वा नसेल तर कुठे आहे त्यांची माणुसकी? पीडीएमसी प्रकरणात चार निष्पापांचे जीव जाऊनही डॉक्टर बचावात्मक पवित्रा घेत असून वरिष्ठांचेही त्यांना पाठबळ आहे.
 

Web Title: Who wants justice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.