बडनेरा रेल्वेस्थानक मार्गाचा वाली कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:50 PM2019-09-01T23:50:44+5:302019-09-01T23:51:06+5:30
यापूर्वी ‘लोकमत’ने सदर रस्त्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आला. थोडासा दिलास प्रवाशांसह वाहन चालकांना मिळाला. मात्र झडसदृश स्थितीमुळे मुरूम उखडून पुन्हा खड्डे पडले आहे. पाण्याचे डबके साचले आहे. या खड्ड्यांमधून वाहने कशी चालवावी तसेच प्रवाशांनी ये-जा कशी करावी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलविण्याकरिता लाखो रुपये खर्च होत आहे. मात्र, येथे येणाऱ्या मार्गाची प्रचंड दैना झालेली आहे. मार्गावर खड्डेच खड्डे पडल्याने याला वाली कोण, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. हा रस्ता रेल्वे सीमेबाहेरील असल्याने याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
यापूर्वी ‘लोकमत’ने सदर रस्त्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आला. थोडासा दिलास प्रवाशांसह वाहन चालकांना मिळाला. मात्र झडसदृश स्थितीमुळे मुरूम उखडून पुन्हा खड्डे पडले आहे. पाण्याचे डबके साचले आहे. या खड्ड्यांमधून वाहने कशी चालवावी तसेच प्रवाशांनी ये-जा कशी करावी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अपघाताचे प्रमाण वाढत असून, वर्षानुवर्षे अशीच स्थिती राहत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. चांदणी चौक ते रेल्वे स्थानकापर्यंतच्या उखडलेल्या मार्गाचे डांबरीकरण कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या धोकादायक रस्त्याचा चेहरामोहरा बदलवावे, अशी मागणी आहे.
पक्का रस्ता केव्हा?
४अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानकाकडे जाणाºया रस्त्याची दैना प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्याला कुणी वाली आहे का, असा संतप्त सवाल शहरवासीयांचा आहे. थातूरमातूर काम करू नये, पक्का रस्ता करा, असे बोलल्या जात आहे.
जुन्या वस्तीतही खड्डे
नवीन तिकीटघराच्या बाजूने रेल्वे स्थानकाच्या हद्दीत खड्डेच खड्डे आहेत. पार्किंंगचालकाने संपूर्ण जागा घेरल्यामुळे खड्ड्यांतूनच मार्ग काढावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने खड्डे तर दुरूस्त करावे, तसेच पार्किंगचालकांना समज देण्याची होत आहे.