ट्रीपल सीट वाहनचालकांना आवरणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:17 AM2021-09-06T04:17:19+5:302021-09-06T04:17:19+5:30

असाईनमेंट अमरावती : शहरात ट्रिपलसिट दुचाकी चालकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. ते बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईकडे दुर्लक्ष ...

Who will cover the triple seat drivers? | ट्रीपल सीट वाहनचालकांना आवरणार कोण?

ट्रीपल सीट वाहनचालकांना आवरणार कोण?

Next

असाईनमेंट

अमरावती : शहरात ट्रिपलसिट दुचाकी चालकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. ते बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सात महिन्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ९२ हजार वाहनचालकांवर कारवाई केली आहे. त्यात ४ हजारांपेक्षा अधिक ट्रीपलसिट वाहनचालक आहेत.

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते, त्याचबरोबर अपघाताचाही धोका वाढतो. त्यानंतरही दररोज बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांना ठेंगा दाखवत नियम पायदळी तुडविले जात आहेत. अनेक विद्यार्थी सुसाट ट्रिपलसिट जातात. समोरच्या चौकात वाहतूक पोलीस दिसले की, मागचा मागेच उतरतो. पोलीस नजरेआड झालेत, की पुन्हा दुसऱ्याच्या मागे तिसरा बसून बेदरकारपणे वाहने हाकली जातात. पोलिसांची नजर चुकवून शहरात हटकून ट्रुिपलसिट वाहने चालविली जातात.

////////////

दुचाकी वाहन चालकांनो, हे नियम पाळा

१) डावी-उजवीकडे वळताना हाताचे इशारे दिले पाहिजेत.

२) प्रखर दिवे न वापरता दुचाकीचा वेग नियंत्रित असावा.

३) हेल्मेट वापरावे. हेड लाइट, ब्रेक लाइट, इंडिकेटर वेळोवेळो तपासा.

४) दोनपेक्षा जास्त व्यक्तीने प्रवास करू नये.

५) मोबाइलवर बोलत बाइक चालवू नये.

६) लहान मुलांना टाकीवर बसवू नका किंवा बॅकसिटवर उलटे बसवू नका.

//////////////////

किती जणांवर झाली कारवाई

जानेवारी : ७०६

फेब्रुवारी : ४४७

मार्च : ४५४

एप्रिल : ४९३

मे: ४४८

जून : ८४२

जुलै : ६९७

////////////

- तर पाचशे, हजारांचा दंड

ट्रिपल सिट : २००

विना लायसन्स : ५००

कर्कश हॉर्न : १०००

मोबाईलवर बोलणे : २००

वेगात वाहन चालविणे : १०००

राॅंग साईडने चालविणे: ५००

सायलेंसर आवाज करणे : १०००

//////////

Web Title: Who will cover the triple seat drivers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.