'त्यांच्या' संपूर्ण घराला वेढले आहे वेलींनी.. त्याच्या कारणामागे आहे एक परंपरागत वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 08:30 AM2021-08-31T08:30:00+5:302021-08-31T08:30:04+5:30

Amravati News जगात विविध छंद जोपासणारे अनेक अवलिया आपण पाहिले आहेत. आपल्या गुरूंनी दिलेला आयुर्वेदाचा वारसा जपणारे एक अवलिया चांदूररेल्वे तालुक्यातील नया सावंगा येथे पाहावयास मिळतो आहे.

The whole house is surrounded by vines. There is a traditional heritage behind it | 'त्यांच्या' संपूर्ण घराला वेढले आहे वेलींनी.. त्याच्या कारणामागे आहे एक परंपरागत वारसा

'त्यांच्या' संपूर्ण घराला वेढले आहे वेलींनी.. त्याच्या कारणामागे आहे एक परंपरागत वारसा

googlenewsNext
ठळक मुद्देगुरुच्या वारसाचे संवर्धन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जगात विविध छंद जोपासणारे अनेक अवलिया आपण पाहिले आहेत. आपल्या गुरूंनी दिलेला आयुर्वेदाचा वारसा जपणारे एक अवलिया चांदूररेल्वे तालुक्यातील नया सावंगा येथे पाहावयास मिळतो आहे. त्यांच्या संपूर्ण घराला आयुर्वेदिक व गुणकारी वेलींनी वेढले आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पतींचे ते अत्यंत जपून संवर्धन करतात. (The whole house is surrounded by vines. There is a traditional heritage behind it)

श्रीकृष्ण नारायण भलावी असे या आयुवेदाचार्यांचे नाव आहे. गुळवेल, धोत्रा, तुळस, सब्जा, शतावरी, पानवेल, लाजवंती, पांढरेभुंज, समुद्रशेष, जटाशंकर, हलजोड, श्वेत अपराजित, पर्णकुटी यांसारख्या असंख्य आयुर्वेद वनस्पती भलावी यांनी आपल्या अंगणात लावल्या व त्याचे जतन केले. त्यांच्या घरात लागलेल्या समुद्रशेष या वेलाने तर संपूर्ण घराला आच्छादन केले आहे. त्यांना त्यांच्या या छंदाविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले की, त्यांचे गुरू पागलदास बाबा यांचा वारसा ते सांभाळत आहेत.

अमरावती रोडवर पोहरा ते चिरोडी मार्गात पागलदास महाराज यांचे आश्रम आहे. त्यांना आयुर्वेदाचे मोठे ज्ञान होते. ते अनेक आजारांवर गुणकारी औषधे देत. त्यांच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित सेवाभावाने श्रीकृष्ण भलावी यांनी त्यांचा वारसा जपण्यासाठी या आयुर्वेदिक वनस्पतींसाठी स्वत:चे जीवन वाहिले असल्याचे त्यांनी सांगितले. उदरनिर्वाह म्हणून शेती आणि दर शनिवारी मंगळवारी ते मंदिरात येणाऱ्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधे देतात. त्यांनी त्यांच्या घराच्या आवारात अशा गुणकारी वनस्पतींचे छोटे जंगलच उभे केले. त्यांचे संपूर्ण कुटुंब या वनस्पतींचे संवर्धन करतात. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या या वृक्षप्रेमाची प्रशंसा केली.


घरातील अनेक वनस्पती या बहुगुणकारी आहेत. सात वर्षांपूर्वी महाराजांपासून प्रेरणा घेत या कार्याला सुरुवात केली. फिरताना जिथे जिथे वेगवेगळ्या वनस्पती दिसतात. तिथून त्या घेऊन मी माझ्या घरी आणून त्याचे जतन करतो. बहुगुणकारी तुळसची चारशे झाडे मी या परिसरात लावली आहेत. अजूनही माझा अभ्यास सुरू आहे.
- श्रीकृष्ण भलावी, नया सावंगा, ता. चांदूर रेल्वे

Web Title: The whole house is surrounded by vines. There is a traditional heritage behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.