पालिकेत रात्री ठेकेदारांची गर्दी कशासाठी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:35+5:302021-06-19T04:09:35+5:30
पान २ चे सेकंड लिड फोटो पी १८ वरूड निविदा मॅनेजचा खटाटोप : सत्ताधारी, विरोधकांचे गळ्यात गळे! वरूड ...
पान २ चे सेकंड लिड
फोटो पी १८ वरूड
निविदा मॅनेजचा खटाटोप : सत्ताधारी, विरोधकांचे गळ्यात गळे!
वरूड : शहरातील विकासकामाच्या निविदा निघाल्याने काही ठेकेदारांनी टेंडर मॅनेजकरिता भाऊगर्दी चालविली आहे. याकरिता मंगळवारी रात्री १० वाजता नगर परिषद कार्यालयात २५ ते ३० ठेकेदारांनी टेंडर मॅनेजकरिता खलबते केल्याचे वृत्त आहे. यावेळी बांधकाम अभियंत्यासह नगराध्यक्षांचे पती आणि उपाध्यक्षसुद्धा उपस्थित होते. परंतु ऑनलाईन ई टेंडर असताना मॅनेज कसे हा प्रश्न चर्चेचा विषय होता, तर रात्रीच्या वेळी कार्यालय उघडे कसे, हा प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पडला होता.
नगर परिषदेत लाखो रुपयांच्या विकास कामाला सुरुवात झाली आहे. त्याबाबत ई टेंडर प्रक्रिया करण्यात आली आहे. काही ठेकेदारांनी टेंडर मॅनेज करण्याकरिता पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून मंगळवारी रात्री दहाचे दरम्यान नगर परिषदेच्या कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी २५ ते ३० ठेकेदारासह, नगर सेवक, नगराध्यक्षांचे पती आणि उपाध्यक्ष काही पदाधिकाऱ्यांसह न.प बांधकाम अभियंता सुद्धा उपस्थित होते.
नगर परिषदेचा कोणताही अधिकारी नसताना नगर परिषदेतील एक अभियंता येऊन ठेकेदाराची तडजोड लावून देतो, असे सांगत असल्याची चर्चा आहे. नगरसेवक व उपाध्यक्षांच्या उपस्थितीत सर्व ठेकेदारांची रात्री १० वाजता कार्यालयात गर्दी दिसल्याने अनेकांचे याकडे लक्ष लागले होते. ई टेंडर जर मॅनेज केले जात असेल तर प्रक्रिया कशासाठी, हा प्रश्न विचारला जात आहे. विरोधक आणि सत्ताधारीसुद्धा एकत्र बसून टेंडरबाबत खलबते करतात. याबाबत नगर परिषदेचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही.
कोट
मी त्यावेळी गावात नव्हतो. नगर परिषदेत रात्री कोण आले, हे माहिती नाही. पदाधिक्कारि ठेकेदारासोबत ई टेंडर बाबत चर्चा करू शकतात. परंतु, मला हा प्रकार माहिती नाही.
- रवींद्र पाटील, मुख्याधिकारी, वरूड