लसीकरणानंतर अँटीबॉडी तपासणी करायची कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:10 AM2021-07-18T04:10:46+5:302021-07-18T04:10:46+5:30
अमरावती : यापूर्वी झालेला कोरोनाचा संसर्ग किंवा लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काही नागरिक आपल्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिकार ...
अमरावती : यापूर्वी झालेला कोरोनाचा संसर्ग किंवा लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काही नागरिक आपल्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंड (अँटीबॉडी) तयार झालेत आहेत का, याची तपासणी करीत आहेत. विविध लॅबमध्ये दिवसाला २० ते २५ जण अशाप्रकारच्या तपासण्या करीत आहेत. या प्रकारामुळे त्यांच्या वावरण्यात काहीसा बिनधास्तपणा दिसून येत आहे.
कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात काही प्रमाणात कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यात प्रतिपिंड तयार होतात. याशिवाय लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतर शरीरात प्रतिपिंड तयार होतात, हे एक प्रकारच कवच आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व नियमांचे पालन करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली. त्तमध्ये ज्या नागरिकांना संसर्ग झालेला नाही, अश व्यक्तींद्वारा त्यांना कोरोना तर होऊन गेलेला नाही, या शंकेने अँटीबॉडीजची तपासणी करताना आढळून येत आहे. शहरातील खासगी पॅथाॅलॉजीत अलीकडे अशा तपासणीसाठी नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्येक नागरिकांनी अशा प्रकारच्या चाचण्यांची काहीच आवश्यकता नसते व लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास यामध्ये गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोना विषाणूत बदल होत असल्याने तयार प्रतिपिंड किती सामना करू शकतील. याविषयी अद्याप संशोधन सुरू असल्याने प्रत्येकाने पंचसूत्रीचे पालन करणे महत्त्वाचे असल्त्चेने डॉक्टरांनी सांगितले.
पाईंटर
एकूण लसीकरण : ७,३८,९९६
पहिला डोस : ५,४९,६२२
दुसरा डोस : १,८९,३७४
लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण : २४.६३ टक्के
बॉक्स
अँटीबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ
शहरात अँटीबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ झाली का, यासंदर्भात येथील रामार्पण पॅथाॅलॉजीचे विजय देवळे यांच्याशी संपर्क साधला असता, लसीकरणानंतर दोन आठवड्यांनी शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का, याची तपासणी करण्यासाठी रोज किंवा एक दिवसाआड एक-दोन व्यक्ती येत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे शहरात रोज किमान २५ तरी चाचण्या होत असण्याची शक्यता डॉ. काळे यांनी वर्तविली.
बॉक्स
तरुणांईसह ज्येष्ठांनाही उत्सुकता
लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यात शरीरातील प्रतिपिंडे वाढतात. त्यामुळे अशा प्रकारच्या तपासण्यांची काहीच आवश्यकता नाही. काहीजण तर केवळ उत्सुकतेपोटी या चाचण्या करीत आहेत. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही आढळून येत आहेत. लसीकरणानंतर संसर्ग जरी झाला तरी गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉ. मंगेश काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कोट
कोरोना होऊन गेला काय किंवा झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडी तयार झाल्यात का, याच्या तपासणीचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. याशिवाय लसीकरणा नंतर ॲन्टीबॉडी वाढल्या काय, यासाठी काही जण तपासणी करतात. वास्तविक पाहता ही तपासणी करण्याची गरज नाही. किंवा या तपासणीत अँटीबॉडी पकडल्या जातील, असेही नाही.
- डॉ श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्य चिकित्सक