-तर कशासाठी निवडले थेट जनतेतून सरपंच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:19 PM2017-12-02T23:19:45+5:302017-12-02T23:20:26+5:30

जनतेमधून थेट सरपंच निवडीचा कायदा करताना केलेल्या चुकांशी आमचा संबंध काय, आमच्या अधिकारावर गदा आणून पदापासून वंचित ठेवण्याचे घटनाबाह्य कार्य करण्याचा शासनाला कुणी अधिकार दिला?

-Why the elected sarpanch from the public? | -तर कशासाठी निवडले थेट जनतेतून सरपंच?

-तर कशासाठी निवडले थेट जनतेतून सरपंच?

Next
ठळक मुद्देटेंब्रुसोंडा येथील सरपंचांचा सवाल : ही तर अधिकारावर गदा

आॅनलाईन लोकमत
चिखलदरा : जनतेमधून थेट सरपंच निवडीचा कायदा करताना केलेल्या चुकांशी आमचा संबंध काय, आमच्या अधिकारावर गदा आणून पदापासून वंचित ठेवण्याचे घटनाबाह्य कार्य करण्याचा शासनाला कुणी अधिकार दिला? आयोगाने पूर्वीच का नाही लक्ष दिले? सरपंचपदी निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिल्यावर पदभार सांभाळण्यापासून वंचित ठेवून थेट प्रशासकाची निवड करता, तर मग हे प्रमाणपत्रच परत घ्या, असा संतप्त सवाल टेंब्रुसोंडा येथे थेट जनतेमधून निवडून आलेल्या आदिवासी महिला सरपंच उर्मीला दहीकर यांनी प्रशासनाला केला आहे.
जिल्ह्यातील सात सरपंचांना पदभार न देता शनिवारी प्रशासक नेमणुकीचे आदेश जिल्हाधिकाºयांनी जि.प.सीईओंना दिले. पं.स. प्रशासनाने चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोंडा, सोनापूर, मेहरीआम, धारणी तालुक्यातील बोबदो, जामपाणी, भातकुलीच्या बैलमारखेडा व चांदूर बाजार तालुक्यातील मिर्झापूर ग्रामपंचायतींवर सरपंचाऐवजी प्रशासकाची नेमणूक केली. ५० टक्के पेक्षा अधिक जागा रिक्त असल्याने येथे रविवारची उपसरपंचपदाची निवडणूक रद्द केली आहे. सरपंचपदाच्या अधिकारावर गदा आणणाºया ठरल्या.
मग प्रमाणपत्रच परत घ्या ना !
आपण आदिवासी महिला सरपंच आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार थेट जनतेतून निवडून आले. प्रशासक निवडण्यापेक्षा सरपंचपदाचे दिलेले प्रमाणपत्रच परत घ्या. अगोदर कायद्यात योग्य तरतुदी करा आणि मग आम्हाला सरपंच बनवा, आयोगाच्या चुकीचा फटका आमच्या कार्यकाळाला का? कुठल्या अधिकाराने, असा संतप्त सवाल टेंब्रुसोंडा येथील सरपंच उर्मीला दहीकर यांनी प्रशासनाला केला आहे. रिक्त जागा वर्षभर उमेदवार न भेटले तर आम्हाला पदापासून वंचित ठेवणार का, असा खडा सवाल त्यांनी केला.

जनतेमधून थेट सरपंचपदी निवडून आल्यानंतरही पदापासून वंचित ठेवणे हे घटनाबाह्य आहे. आम्ही जनतेमधून थेट निवडून आल्यावर प्रशासनाची चूक अधिकारावर गदा आणणारी आहे. मग प्रमाणपत्रच पर घ्या.
- उर्मीला दहीकर, सरपंच,
टेंब्रुसोंडा, ता. चिखलदरा

Web Title: -Why the elected sarpanch from the public?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.