आता फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:56+5:302021-09-03T04:12:56+5:30

बॉक्स असे वाढत गेले दर डिसेंबर ७१९ जानेवारी ७२४ रुपये फेब्रुवारी ७९४ रुपये मार्च ...

Why even light a stove in a flat now? | आता फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली?

आता फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली?

Next

बॉक्स

असे वाढत गेले दर

डिसेंबर ७१९

जानेवारी ७२४ रुपये

फेब्रुवारी ७९४ रुपये

मार्च ८१४ रुपये

एप्रिल ८३४ रुपये

मे ८३४ रुपये

जून ८३४ रुपये

जुलै ८५९.५० रुपये

ऑगस्ट ८८४.५० रुपये

सप्टेंबर ९०९.५० रुपये

--

सबसिडी केवळ १६ रुपये

सन २०१४ मध्ये ४६१ रुपयांना मिळणारे सिलिंडर थेट ९०९.५० रुपयांवर गेले असताना शासनातर्फे दिली जाणारी सबसिडी केवळ १६ रुपये मिळत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांकडूनही शासन बेसुमार टॅक्स वसूल करीत असल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे.

--

व्यावसायिक सिलिंडरही महागले

व्यावसायिक सिलिंडरचे भाव एप्रिल २०२१ मध्ये १७१२ रुपये होते. त्यानंतर कोरोनामुळे हॉटेल बंद राहिल्याने मागणी थंडावल्याने जूनपर्यंत ते कमी होत १५२४ रुपयांवर स्थिरावले. जुलै मध्ये १०४ रुपयांनी वाढले. ऑगस्टमध्ये पुन्हा ७९ रुपयांनी वाढले आणि सप्टेंबरमध्ये हॉटेल्स सुरू झाल्याने थेट ७० रुपयांनी वाढून १७७१ रुपयांवर स्थिरावले आहे.

--

महिन्याचे गणित बिघडले

मजुरीत वाढ नसल्याने मिळकत कमी अन खर्च अधिक अशी स्थिती झालेली आहे. त्यातच स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर दर महिन्यात २५ रुपयांनी उसळी घेत असल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे. शासनाने सामान्यांचा विचार करायला हवा.

- माया वासनिक, गृहिणी, बडनेरा

--

माझा किरकोळ व्यवसाय आहे. नाष्टा पूर्वीच्याच दरात विकावे लागत आहे. मात्र, गॅस सिलिंडर, तेल या नित्याने लागणाऱ्या वस्तूंचेच भाव वाढल्याने खर्च अधिक येत असल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे.

- मंदा चव्हाण,

गृहिणी, कारला

Web Title: Why even light a stove in a flat now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.