आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप का नाही? आदिवासी संघटनांचा राज्य सरकारला सवाल
By गणेश वासनिक | Published: April 14, 2023 01:45 PM2023-04-14T13:45:51+5:302023-04-14T13:48:25+5:30
सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआयने पुढाकार घ्यावा
अमरावती : सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआय पुढाकार घेऊन आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट अभिछात्रवृत्ती लागू करतील का? असा सवाल आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे केला आहे.
सद्य:स्थितीत एप्रिल २०२१ नंतर नोंदणी केलेले व त्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी असणाऱ्या आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्तीसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय तीन महिन्यापूर्वी शासनाने घेतला आहे. मात्र छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (सारथी) यांनी मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा - कुणबी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक पी. एचडी करणाऱ्या उमेदवारांसाठी सारथी मार्फत छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अभिछात्रवृत्ती सरसकट सुरु केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर (महाज्योती) यांनी इतर मागासवर्गीय, विमुक्त -जाती,भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट अभिछात्रवृत्ती सुरु केली आहे. परंतु आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (टिआरटिआय) यांनी आदिवासी संशोधक उमेदवारांना सरसकट फेलोशिप का लागू केली नाहीत? अशी चर्चा आता आदिवासी समाजात होत आहे.
आदिवासी समाजातील संशोधक विद्यार्थ्यांनी फेलोशिपसाठी बराच संघर्ष केल्यानंतर शासनाने दरवर्षी १०० अनुसूचित जमातीच्या संशोधक उमेदवारांना अभिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल २०१९ नंतर नोंदणी करणारे विद्यार्थी ग्राह्य धरले नसून ते वंचित आहे. त्यातील अनेकांनी आर्थिक परिस्थिती अभावी संशोधन करणे सोडून दिले आहे. मुळातच आदिवासी समाजात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतरांच्या तुलनेत कमीच आहे. अशा परिस्थितीत त्यांना सरसकट फेलोशिप देऊन अर्थसहाय्य करणे आणि प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
अनुसूचित जातीच्याही विद्यार्थ्यांचा संघर्ष
सारथी, महाज्योती प्रमाणेच बार्टीनेही अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, म्हणून मुंबईच्या आझाद मैदानात गत दीड महीना बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. अखेर बुधवार, १२ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अभिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
संशोधन करणारे आदिवासी विद्यार्थी इतरांच्या तुलनेत तसेही नगण्यच आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अट न ठेवता एप्रिल २०१९ पासूनच्या विद्यार्थांना सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआयने आदिवासी संशोधकांना सरसकट फेलोशिप देण्यात द्यावी.
- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम.