मेळघाटातील वाघांच्या शिकारीची सीबीआय चौकशी का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 07:04 AM2021-02-06T07:04:37+5:302021-02-06T07:06:03+5:30

मेळघाटात वाघ मरणे आणि मारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. उघडकीस येत असलेल्या घटनांवरून मेळघाटातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

Why there is no CBI probe into tiger poaching in Melghat? | मेळघाटातील वाघांच्या शिकारीची सीबीआय चौकशी का नाही?

मेळघाटातील वाघांच्या शिकारीची सीबीआय चौकशी का नाही?

Next

अनिल कडू
 
परतवाडा (जि. अमरावती) : मेळघाटात वाघ मरणे आणि मारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. उघडकीस येत असलेल्या घटनांवरून मेळघाटातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. राजस्थानातील वाघांच्या शिकारीबाबत सीबीआय चौकशी होते, तर मेळघाटातील वाघांच्या मृत्यूंची का नाही, असा सवाल वन्यजीवप्रेमी उपस्थित करीत आहेत.
मृत्यूनंतर सात ते आठ दिवसांनंतर मेळघाटात वाघाचा मृतदेह सापडतो, तेव्हा तो मृतदेह सडलेला, कुजलेला असतो. मागील तीन वर्षांत अशा पाच घटना पुढे आल्या आहेत. एप्रिल २०१८ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागात एका वाघाचा मृतदेह मृत्यूनंतर नऊ दिवसांनी आढळला. याच व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३ मार्च २०१९ ला अकोट वनपरिक्षेत्रात टी-३५ नामक वाघिणीचा मृतदेह मृत्यूनंतर सहा दिवसांनंतर दिसला. अंबाबरवामधील टी-२३ नामक वाघाचा मृतदेह लागूनच असलेल्या मध्यप्रदेशातील सीमेत मृत्यूनंतर १५ दिवसांनंतर एप्रिल २०२० मध्ये सापडला. रायपूर वनपरिक्षेत्रात मृत्यूनंतर पाच दिवसांनी २० जानेवारी २०२१ ला वाघाचा मृतदेह आढळला. चिखलदरा वनपरिक्षेत्रातील मोथा परिसरात मृत्यूनंतर १५ दिवसांनी जानेवारी २०१९ मध्ये एका वाघाचा मृतदेह आढळून आला.  

वाघाला आयडी नाही
व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातही वाघ आहेत. ज्या प्रादेशिक वनविभागात वाघ आहेत त्या वाघांना ओळख नाही. आयडी नाही. त्यामुळे ते बेवारस ठरत आहेत. 

सीबीआय चौकशीची मागणी
सन २००५ मध्ये मनमोहनसिंग पंतप्रधान असताना राजस्थानमधील सिरस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. २००९ मध्येही भंडारा, चंद्रपूरकडील वाघांच्या शिकारींची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली. याच धर्तीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या शिकारी आणि आढळून येत असलेल्या वाघांच्या मृतदेहांची चौकशी सीबीआयकडून करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.

Web Title: Why there is no CBI probe into tiger poaching in Melghat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.