लस देता का लस, शासकीयमध्ये दुष्काळ, खासगीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:13 AM2021-07-25T04:13:08+5:302021-07-25T04:13:08+5:30

(असाईनमेंट) अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी व संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. मात्र, शासकीय लसीकरण केंद्राला ...

Why vaccinate, drought in government, private song off | लस देता का लस, शासकीयमध्ये दुष्काळ, खासगीत बंद

लस देता का लस, शासकीयमध्ये दुष्काळ, खासगीत बंद

Next

(असाईनमेंट)

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी व संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. मात्र, शासकीय लसीकरण केंद्राला नियमित पुरवठा होत नसल्याने बहुतांश केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावते. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण बंद असल्याने. लसीकरण केंद्रांवर पहाटेपासून रांगा लागत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु झाले. आतापर्यत पाच टप्प्यात लसीकरण होत आहे. यामध्ये आतापर्यत ७,७०,४८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यात ५,८६,८९६ नागरिकांनी पहिला व २,०१ ७८८ नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे. बहुतेक नागरिकांचा दुसरा डोज घ्यायचा आहे. त्यांचा विहित कालावधी देखील संपुष्ठात आलेला असतांना लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना माघारी परतावे लागत आहे.

सुरुवातीला खासगी रुग्णालयांद्वारा कोविशिल्ड १९,५०० व कोव्हक्सिनचे ४८० डोस देण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यत खासगी रुग्णालयातील लसीकरण बंदच आहे.

जिल्ह्यात आतापर्यत ७,५५,५८० लसींचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामध्ये ५,२९,३३० कोव्हक्सिन व १,६३,२५० डोस कोव्हक्सिनचे आहेत. जिल्ह्यात रोज किमान १५ हजार डोसची आवश्यकता असतांना त्यातुलनेत पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण केंद्र बंद राहत आहेत.

पाईंटर

१८ ते ४४ वयोगट

पहिला डोस : १,३७,१२३

दुसरा डोज : १३,१३८

४६ ते ४९ वयोगट

पहिला डोस : १,८९,९५१

दुसरा डोज : ७१,७४०

६० पेक्षा जास्त : १,७८,५९१

दुसरा डोस : ८७,०९४

---------------------------

शासकीय रुग्णालयात लसीकरण : ७,४०,४८६

खासगीमध्ये लसीकरण : १९,०००

-------------

१) लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खासगी रुग्णालयांना लसींचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर मात्र, खासगी रुग्णाळयांचे लसीकरण बंद आहे. त्यांना आता कंपनीस्तरावर लस करावी लागणार आहे.

२) जिल्ह्यात सद्यस्थितीत शासकीय रुग्णालयात लसीकरण होत आहे. याकरीता नियमित पुरवठा होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अर्धेअधिक केंद्र बंद राहत आहे. या आठवड्यात लसींचा स्टॉक संपल्याने चार दिवस जिल्ह्यातील लसीकरण बंद होते. त्यामुळे नागरिकांना केंद्रांवरुन माघारी परतावे लागले.

कोट

हेच का मोफत लसीकरण

लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने गावातील लसीकरण केंद्र राहत आहे. केंद्र कधी होणार याची माहिती मिळत नाही. याशिवाय कोव्हक्सिनचे डोस देखील उपलब्ध नसतात.

भुषण पाटील, चांदूर बाजार

कोट

शासकीय लसीकरण केंद्रांवर रांगा राहत असल्याने खासगी रुग्णालय हा पर्याय आहे. यासाठी आवश्यक पैसे द्यायची तयारी आहेत. मात्र, एकाही खासगी रुग्णालयात लस उपलब्ध नाही.

रेणुका काळे, अमरावती

-----------------

कोट

लसीकरणासाठी नियमित पुरवठा होत नाही. मागणीच्या तुलनेत कमी डोस मिळतात. त्यामुळे लसीकरण केंद्र बंद राहतात. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध नाही.

डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी

Web Title: Why vaccinate, drought in government, private song off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.