पत्नी बाहेरख्याली; पतीने संपविली जीवनयात्रा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Published: August 1, 2023 07:54 PM2023-08-01T19:54:38+5:302023-08-01T19:55:00+5:30

पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्मघात करवून घेतला.

wife affair another guy Husband ends life journey case against both | पत्नी बाहेरख्याली; पतीने संपविली जीवनयात्रा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नी बाहेरख्याली; पतीने संपविली जीवनयात्रा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

अमरावती : पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्मघात करवून घेतला. दि. ३ जून रोजी सकाळी ९च्या सुमारास बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी, मृत ३९ वर्षीय तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी दि. ३१ जुलै रोजी रात्री १०.२१ च्या सुमारास मृताची पत्नी व तिचा प्रियकर सनी उर्फ अमन सहारे (रा. बेलपुरा) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रवींद्र नामक ३९ वर्षीय युवकाचे एका तरुणीशी आर्य समाजात लग्न झाले होते. लग्नानंतर ती त्याच्या घरी नांदावयास गेली. त्यावेळी आरोपी सनी सहारे हा त्याच्याकडे नेहमीच येत राहायचा. तो रवींद्रच्या पत्नीशी अश्लील चाळे करायचा. काही दिवसांनी ती बाब रवींद्रला माहीत झाली. त्यामुळे त्याने ती बाब स्वत:च्या बहिणीला सांगितली. आपण लग्न करून फसलो, पत्नीचे व सनी सहारे यांच्यात अफेअर असल्याचेही त्याने नातेवाइकांना सांगितले होते.

दोघांकडून जिणे मुश्किल
पत्नी व सनी सहारे याने रवींद्रला त्रास देणे सुरू केले. त्याचे जीवन जगणे मुश्किल केले. त्याला हैराण करून सोडले. तू मर, असे बोलून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. पत्नी व तिच्या प्रियकराचा त्रास अलीकडे अधिकच वाढल्याने त्याने दि. ३ जून रोजी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
 

Web Title: wife affair another guy Husband ends life journey case against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.