सुपारी देऊन पत्नीची हत्या
By admin | Published: June 6, 2016 12:11 AM2016-06-06T00:11:39+5:302016-06-06T00:11:39+5:30
येथील माजी सरपंच दिलीप एकनाथ चौधरी याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते.
अनैतिक संबंधातून घटना : पत्नीने केला होता विरोध
वाढोणा रामनाथ : येथील माजी सरपंच दिलीप एकनाथ चौधरी याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. परंतु मृत पत्नीचा या प्रकाराला विरोध होता. म्हणून दिलीप चौधरी याने पत्नीची हत्या केली.
मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्यांंतर्गत येत असलेल्या वाढोणा रामनाथ येथील माजी सरपंच दिलीप चौधरी याचे बसस्टॉपजवळ राहते घर आहे. गावातील एका महिलेसोबत गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते, परंतु पत्नी मृत शालिनी चौधरी हिचा या संबंधाला विरोध होता. म्हणून दिलीप चौधरीने सहा लाख रुपयांचे आमिष दाखवून सदर महिलेचा चुलत भाऊ प्रकाश प्रभाकर राऊत आणि पत्नी अर्चना प्रभाकर राऊत यांना खुनामध्ये सहभागी करून घेतले. २ जून रोजी सदर महिलेसह प्रकाश व अर्चना असे तिघेही दिलीप चौधरीच्या घरी गेले होते. तेव्हा पत्नी शालिनी घरात एकटी होती. यावेळी त्यांनी तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून मारहाण केली व तिचा खून करून मृतदेह बाथरुममध्ये टाकला. त्यावेळी मृत पत्नीचा पती दिलीप चौधरी कारंजा लाड येथे तूर विकण्याकरिता गेला होता. मृत शालिनी सुस्वभावी होत्या. मेहनती होत्या. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावकरी हळहळ व्यक्त करत आहे. (वार्ताहर)