कृत्रिम पाणवठ्यांवरच वन्यप्राण्यांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 09:52 PM2018-04-29T21:52:48+5:302018-04-29T21:52:48+5:30

Wild animals on artificial waterfalls | कृत्रिम पाणवठ्यांवरच वन्यप्राण्यांची मदार

कृत्रिम पाणवठ्यांवरच वन्यप्राण्यांची मदार

googlenewsNext
ठळक मुद्देचांदूर रेल्वे, वडाली वनपरिक्षेत्र : ट्रॅप कॅमेऱ्यांमुळे शिकाऱ्यांवर वचक

अमोल कोहळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : वडाळी- चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटले असून, कृत्रिम पाणवठ्यांवरच वन्यप्राण्यांची मदार राहिली आहे. या वनपरिक्षेत्रांतर्गत १२ कृत्रिम पाणवठे निर्माण केले असून, प्रत्येक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे जंगल परिसरात अनोळखी व्यक्त फिरकण्यासही धजावत नाही.
चांदूर रेल्वे, वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत माळेगाव, चिरोडी, पोहरा व वडाळी वनवर्तुळ अंतर्भूत आहेत. याअंतर्गत विविध दुर्मिळ व मौल्यवान औषधी वनस्पतींच्या सहवासात वन्यप्राण्यांचा वास्तव्य आहे. दरवर्षी या जंगलातील नैसर्गिक पाणवठे पूर्णत: आटत नसले तरी यावर्षी मात्र अल्प पावसामुळे नदी-नाल्यांना पूर गेलेच नसल्याने ही पाणवठे केव्हाचीच आटली आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ वनपरिक्षेत्र अधिकाºयांच्या मार्गदर्शनात कृत्रिम पाणवठ्यांची देखरेख, स्वच्छता, नियमित पाणी भरणे आदी दक्षता घेण्यात येत आहे. तसेच वनरक्षक, वनमजुरांची नियमित गस्त राहत असल्याने जंगलात शिरण्याची कुणीही हिंमत करीत नाहीत. त्यामुळे येथील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात येत असल्याचे दिसून आले.
वृक्षांच्या सावलीत वन्यप्राण्यांचा विसावा
वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात ज्विविध वृक्षांसह अनेक प्रजातींच्या वनस्पती डोळ्याची पारणे फेडण्याजोगी आहेत. त्यात विविध पक्ष्यांची भर पडत असल्याने मनमोहक वातावरणाची निर्मिती झालेली आढळते. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिवाही काहिली शमविण्यासाठी भरदुपारी वन्यप्राण्यांचे कळप या वृक्षांच्या सावलीचा आश्रय घेतात. दरम्यान एखादी व्यक्ती जंगलात शिरली असली तरी हा कळप चौताळत नाही, हे विशेष.

चिरोडी वर्तुळाच्या वरुडा वनक्षेत्रातील पाणवठ्यांची पाहणी, स्वच्छता दरदिवशी येथील वनरक्षक व वनमजूर करीत आहे. या भागात नियमित गस्त वाढविली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकार, वृक्षकटाईला आळा बसला आहे.
- एम.के. निर्मळ,
वर्तुळ अधिकारी, चिरोडी, माळेगाव

Web Title: Wild animals on artificial waterfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.