मजुरांची वानवा, मनसूनपूर्व शेतीची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:40+5:302021-06-04T04:11:40+5:30

पूणे, मुंबईहून आलेली कुटुंब वळले शेतीकडे, भावा-भावात शेतीसाठी रस्सीखेच, नवीन सामाजिक समस्येने शेतकरी हतबल प्रशांत काळबेंडे जरूड : ...

Wilderness of laborers, pre-monsoon farming activities stalled | मजुरांची वानवा, मनसूनपूर्व शेतीची कामे रखडली

मजुरांची वानवा, मनसूनपूर्व शेतीची कामे रखडली

Next

पूणे, मुंबईहून आलेली कुटुंब वळले शेतीकडे, भावा-भावात शेतीसाठी रस्सीखेच, नवीन सामाजिक समस्येने शेतकरी हतबल

प्रशांत काळबेंडे

जरूड : कोरोनाचे संकट आणखी गडद होत असताना मान्सूनपूर्व पेरणी मशागतीच्या कामांकरिता मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. शेतीत यापूर्वी पिकविलेला पीक अद्यापही घरात पडून असल्याने व शेती करण्यासाठी हातात पैसे नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येतो. परंतु, यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे मजूर व महिला वर्ग कामावरच जात नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांची नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यातच पुणे, मुंबई सारख्या शहरात कंपनीमध्ये कामावर असलेले शेतकरी पुत्र गावाकडे परत असल्याने व त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे पैशाअभावी घरात भांडणे होत असून, घरच्या स्त्रियांमध्ये घरकामावरून खटके उडत आहे. शहरात असलेली नोकरी गेल्याने कौटुंबिक कलह वाढला. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात भावा-भावांमध्ये शेतीच्या हिस्से वाटणीसाठी रस्सीखेच सुरू झाल्याने नवीन सामाजिक समस्येला शेतकरी कुटुंबाला सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीत माणसा-माणसांतील प्रेम कमी झाले असून, बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे कोरोना संशयित म्हणून पाहिले जात असल्याने आजूबाजूचे शेजारीसुद्धा या कुटुंबासोबत वाळीत टाकल्यासारखा व्यवहार करीत असल्याने शेजाऱ्यांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर कोणत्याही आजारी व्यक्तीला दवाखान्यात पोहचविण्याचे सौजन्यही दाखवत नसल्याने या कोरोनाह्या भीतीने माणसातील माणुसकी नष्ट होत चालल्याचे विदारक चित्र पुढे येऊ लागले आहे.

Web Title: Wilderness of laborers, pre-monsoon farming activities stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.