तीन वर्षांत अमरावती जिल्ह्यात ५९ नागरिकांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:07 PM2018-11-30T13:07:33+5:302018-11-30T14:19:16+5:30

मानवी वस्तीचे जंगलात अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष तसेच रस्त्यातील धडकेच्या आतापर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांत ५९ जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले आहे.

Wildlife attack on 59 people in Amravati district in three years | तीन वर्षांत अमरावती जिल्ह्यात ५९ नागरिकांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला

तीन वर्षांत अमरावती जिल्ह्यात ५९ नागरिकांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला

Next
ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यात पाच बळीरस्त्यातील धडकेसाठी कधी मिळणार मदत?

मोहन राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती: मानवी वस्तीचे जंगलात अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष तसेच रस्त्यातील धडकेच्या आतापर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांत ५९ जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये पाच जणांचा बळी गेला. विशेष म्हणजे, रस्त्यावर वन्यप्राण्याची धडक लागून वाहनचालक जखमी झाल्यास नुकसानभरपाईची तरतूद नाही. धामणगाव रेल्वे तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे अपघाताच्या मंगळवार व बुधवारी पाठोपाठ तीन घटना घडल्या. यामध्ये मंगरूळ दस्तगीर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर उमदा युवक माधव काळे (३५) यांचा गुरुवारी सेवाग्राम येथे उपचारादरम्यान निधन झाले. भाचीला पेपरला सोडून परत येत असताना रानडुकरांच्या कळपाला दुचाकी धडकल्याने हा अपघात झाला.
रानडुक्कर, रोहींच्या कळपामुळे रस्त्याने दुचाकीच नव्हे, चारचाकी वाहनेही सांभाळून चालविण्याची वेळ आली आहे. तिवसानजीक बुधवारी रोहीला धडकलेली पोलीस व्हॅन थोडक्यात बचावली.

रानडुकरांचे सर्वाधिक हल्ले
वन्यप्राण्यांचे हल्ले तसेच त्यांच्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक रानडुकरांनी घडविले आहेत. २०१६ मध्ये ११, २०१७ मध्ये १८, तर २०१८ मध्ये २० जण गंभीर जखमी झाले. २०१७ मध्ये अशा प्रकरणांमध्ये दोघांनी प्राण गमावले, तर यंदा धामणगाव रेल्वे तालुक्यात वाघाने दोघांचा जीव घेतला, तर गुरुवारी माधव काळे यांचा मृत्यू झाला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

रस्ता अपघातात कधी मिळणार मदत
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतात काम करताना शेतमजूर -शेतकरी जखमी झाल्यास शासन त्यांना आर्थिक मदत देते. मात्र, रस्त्यावर वन्यप्राण्यांमुळे अपघात झाल्यास मदत मिळत नाही. वनविभागाने पंचानामा करून शासनस्तरावर आतापर्यंत २७ प्रकरणे पाठविली आहेत.

६२ पाळीव ठरले बळी
हिंस्त्र श्वापदांच्या बळी ठरलेल्या ६२ पशूंकरिता मागील तीन वर्षांत पशुमालकांना शासनाच्या नियमानुसार मदत देण्यात आली आहे. ती तोकडी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांना मदत अपुरी
आठ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. कितीही नुकसान झाले तरी पंचवीस हजार रुपये मदत शासन, वनविभाग करते. ती अपुरी आहे.

वन्यप्राण्यांमुळे रस्त्यावर अपघात झाला, तर त्याचा पंचनामा करून आम्ही शासनस्तरावर पाठवितो. आम्ही पंचनाम्यात तसे नमूद करतो.
- अशोक कविटकर, सहायक वनसंरक्षक, अमरावती

Web Title: Wildlife attack on 59 people in Amravati district in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.