मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आज मचानीवर वन्यप्राणी गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 05:00 AM2022-05-16T05:00:00+5:302022-05-16T05:00:55+5:30

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाट व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना केली जाते. दोन वर्षांनंतर सर्वसामान्य निसर्गप्रेमी यात सहभागी होणार आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना, गुगामल, अकोट, मेळघाट बफर, अकोला व पांढरकवडा अशा सहा वन्यजीव विभागांत असलेल्या नैसर्गिक व कृत्रिम अशा  एकूण ४६६ पाणवठ्यांवर प्राणी गणनेकरिता मचानी तयार केल्या आहेत. येथे ठिय्याकरिता निसर्गप्रेमी व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून सशुल्क आरक्षण पूर्ण झाले.

Wildlife census on scaffolding today at Melghat Tiger Reserve | मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आज मचानीवर वन्यप्राणी गणना

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आज मचानीवर वन्यप्राणी गणना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सहा वन्यजीव विभागांतर्गत १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला मचानीवरून वन्यप्राणी गणना होणार आहे. वाघ, अस्वल, रानगवे, दिवटे, लांडगे, कोल्हे या वन्यप्राण्यांसह सरपटणारे प्राणी व पक्ष्यांचे दर्शन वन्यप्रेमींना होणार असून, त्याची नोंद त्यांना करावी लागणार आहे. नियमांचे काटेकोर पालन यादरम्यान करावे लागणार आहे. 
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाट व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना केली जाते. दोन वर्षांनंतर सर्वसामान्य निसर्गप्रेमी यात सहभागी होणार आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना, गुगामल, अकोट, मेळघाट बफर, अकोला व पांढरकवडा अशा सहा वन्यजीव विभागांत असलेल्या नैसर्गिक व कृत्रिम अशा  एकूण ४६६ पाणवठ्यांवर प्राणी गणनेकरिता मचानी तयार केल्या आहेत. येथे ठिय्याकरिता निसर्गप्रेमी व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून सशुल्क आरक्षण पूर्ण झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी, सिपनाच्या उपवनसंरक्षक दिव्या भारती, गुगामलचे उपवनसंरक्षक सुमंत सोलंखे, अकोटचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, अकोला येथील विभागीय वनअधिकारी निमजे व पांढरकवडाचे विभागीय वन अधिकारी किरण जगताप यांच्या मार्गदर्शनात १६ मे रोजी प्राणी गणना होत आहे.
कोरोनामुळे दोन वर्षांत फक्त वन कर्मचारी सहभाग होते. यावर्षी १६ मे रोजी ४२४ निसर्गप्रेमी व ५८ स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. बोर्डिंग पॉइंट ते मचाणपर्यंत वन विभागाच्या वाहनाने पोहोचवणे व परत आणण्याची व्यवस्था केलेली आहे.

अनेकांची निराशा
ऑनलाइन पद्धतीत अनेकांना सहभागी होता न आल्याने निराशा झाली आहे. तथापि, अमरावती जिल्ह्यासह अकोला, औरंगाबाद, बैतुल, भंडारा, हैदराबाद, जाफराबाद, मुंबई, पुणे, यवतमाळ, किनवट, परभणी, नांदेड, नागपूर, वाशिम, वर्धासह राज्यभरातील विविध ठिकाणांवरून वन्यप्रेमींनी यात सहभाग घेतला आहे.

 

Web Title: Wildlife census on scaffolding today at Melghat Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.