वन्यप्राण्याची संख्या प्रचंड, पाणवठे अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:38+5:302021-04-16T04:12:38+5:30

अमोल कोहळे पोहरा, चिरोडी, वर्तुळात प्रत्येकी दोन सीमेंट पाणवठे पोहरा बंदी :उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात तेव्हा कृत्रिम पाणवठ्यावर ...

Wildlife is huge, water resources are scarce | वन्यप्राण्याची संख्या प्रचंड, पाणवठे अपुरे

वन्यप्राण्याची संख्या प्रचंड, पाणवठे अपुरे

Next

अमोल कोहळे

पोहरा, चिरोडी, वर्तुळात प्रत्येकी दोन सीमेंट पाणवठे

पोहरा बंदी :उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात तेव्हा कृत्रिम पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची तहान भागविण्याची मदार असते. अमरावतीलगत पोहरा, चिरोडी वर्तुळात संख्या प्रचंड, तर कृत्रिम बशी आकाराचे सीमेंट पाणवठे केवळ चार आहेत. त्यांच्या भरवशावर वन्यप्राण्यांना उन्हाळा सुसह्य होणार नाही, हे नक्की.

बशी आकाराच्या सीमेंट पाणवठ्यामध्ये याकरिता भर घेणे अपेक्षित आहे. चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वर्तुळातील जंगलात दोन सीमेंट पाणवठे आहे तर वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वर्तुळातील जंगलात दोन सीमेंट पाणवठे आहे. अशाप्रकारे पोहरा, चिरोडी, वर्तुळात प्रत्येकी दोन बशी आकाराचे सीमेंट पाणवठे तयार केले तर उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची भटकंती थांबून पाणी पिण्याची सोय होईल. राखीव जंगलात एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असतो. विशेषत: पिण्याच्या पाण्यासाठी त्यांची इकडून तिकडे भटकंती सुरु असते. भटकंती दरम्यान वन्यप्राण्यांची अपघाताची घटनाही टळू शकते. यासाठी वन्य प्रण्यांचे वास्तव्य असलेल्या जंगलात जलस्त्रोता जवळच बशी आकाराच्या सीमेंट पाणवठ्याची व्यवस्था करणे जिकरीचे झाले आहे. पोहरा, चिरोडी वर्तुळातील जंगलात हरण, चितळ, रोही काळवीट, रानडुक्कर, मोर या वन्यप्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती होऊनये यासाठी आणखी बीश आकराच्या सीमेंट पाणवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

Web Title: Wildlife is huge, water resources are scarce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.