खुर्चीला चिकटलेल्यांची होईल का बदली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:19 PM2018-05-27T23:19:48+5:302018-05-27T23:20:21+5:30

विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाकडून बदली करण्यात येणार आहेत.

Will the chair be sticky? | खुर्चीला चिकटलेल्यांची होईल का बदली ?

खुर्चीला चिकटलेल्यांची होईल का बदली ?

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा सवाल : जुनच्या पहिल्या आठवड्यात येणार यादी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाकडून बदली करण्यात येणार आहेत.
तत्पुर्वी ३१ मे रोजी बदलीचा आदेश निघण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत. त्याअनुषंगाने एकाच टेबलवर राहून मलिदा लाटणाºयांची बदली होईल का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
८ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाºया महापालिकेत तुर्तास १५८८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात वर्ग १ व वर्ग २ चे प्रत्येकी १३, वर्ग ३ चे ४३० तर वर्ग ४ चे ११३२ कर्मचाºयांचा समावेश आहे. यातील वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाºयांकडे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाºयांच्या प्रामुख्याने बदल्या केल्या जातात. यात अधीक्षकांसह वरिष्ट व कनिष्ट लिपिक, सहायक अधीक्षक, लेखापाल, शिपाई, बिटप्यून , स्वास्थ्य निरिक्षक आदींचा समावेश आहे. यातील अनेक कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर कार्यरत आहेत. अनेक टेबलवर कमिशन मिळत असल्याने आणि ‘वरचा खर्च ’वरच्या वर भागत असल्याने अनेकांकडून बिदागीचा टेबल सोडण्याचा मोह सुटत नाही. आयुक्त हेमंत पवार यांनी अशा चिपकू कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याची सुचना विभागप्रमुखांसह प्रभारी उपायुक्त महेश देशमुख, सहायक आयुक्त राहूल ओगले यांना दिले होते. बरहुकूृम अशा चिपकूंसह बदलीस पात्र असणाºयांची यादी तयार करण्यात आली आहे. यात कर आणि स्वच्छता विभागात व्यापक फेरबदल करण्यात येणार असून काही सहायक आयुक्तांसह उपअभियंत्यामध्येही खांदेपालट करण्यात येणार आहे.२८ व २९ मे रोजी आयुक्त नसल्याने जुनच्या पहिल्या आठवड्यात बदलीचे आदेश काढले जाण्याची शक्यता आहे.
बदली आदेश पाळणार ?
ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात , त्यांनी तातडीने बदलीस्थळी रुजू व्हावे , अन्य कर्मचारी रुजू होण्याची प्रतिक्षा न करता विभागप्रमुखांनी बदलीप्राप्त कर्मचाऱ्यास ‘रिलिव्ह’ करावे, सामान्य प्रशासन विभागास त्याबाबत अहवाल द्यावा, अन्यथा शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा बदली आदेशात असतो. मात्र आयुक्तांच्या त्या आदेशाला हरताळ फासत अनेक कर्मचारी बदली ठिकाणी रुजू होत नाहीत. हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी बदलीचे आदेश संबंधित कर्मचारी अधिकारी पाळतात की कसे , हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Will the chair be sticky?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.