गुरुकुंजाला मिळणार काय स्मशानवाट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:12 AM2021-05-26T04:12:41+5:302021-05-26T04:12:41+5:30
लोकमत इम्पॅक्ट फोटो पी २५ गुरुकुंज गुरुकुंज मोझरी : पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी व तिवसा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ...
लोकमत इम्पॅक्ट
फोटो पी २५ गुरुकुंज
गुरुकुंज मोझरी : पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी व तिवसा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सोमवारी गुरुकुंज येथील स्मशानभूमीला भेट दिली. यावेळी स्मशानवाटेचा बिकट प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तीन वर्षांपासून गुरुकुंजाच्या स्मशानभूमीतील रस्त्याचा प्रश्न प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे रखडला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना अंत्यविधीसाठी जाताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या हा प्रश्न ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला. त्याची दखल घेत पालकमंत्री प्रशासकीय लवाजम्यासह पोहोचल्या. यंदाच्या पावसाळ्यात चांगला रस्ता उपलब्ध होण्याचे संकेत या प्रशासकीय भेटीमुळे मिळाले आहेत. याबाबत तहसीलदारांसोबत संपर्क साधला असता, त्यांनी स्मशानवाट निर्माण करण्यासाठी दोन पर्यायांवर यावेळी चर्चा झाल्याचे सांगितले.
बॉक्स
प्रशसनासमोर आव्हान
अवघ्या दहा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी पक्का रस्ता निर्माण करणे प्रशासकीय यंत्रणेकरिता आव्हान आहे, पण अशक्य नाही. त्यामुळे यंदा तरी ही दीर्घकालीन समस्या निकाली निघेल का, याची उत्सुकता ग्रामस्थांमध्ये आहे. त्यात भूमी अधिग्रहण हा विषय अनेक वर्षांपासून प्रशासकीय स्तरावर रखडला आहे.