साडेचार कोटींच्या रेतीमुळे अमरावती पोलिसांवरचा डाग पुसला जाणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 07:21 PM2018-02-25T19:21:00+5:302018-02-25T19:21:00+5:30

अमरावती-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर चार दिवसांपूर्वी ९२ ट्रक व तीन पोकलँड पकडून चार कोटी ३८ लाखांचा मुद्देमाला अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता.

Will the stain of Amravati police be washed away by the 4.5 crores sand? | साडेचार कोटींच्या रेतीमुळे अमरावती पोलिसांवरचा डाग पुसला जाणार का ?

साडेचार कोटींच्या रेतीमुळे अमरावती पोलिसांवरचा डाग पुसला जाणार का ?

Next

- चेतन घोगरे
अमरावती : अमरावती-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर चार दिवसांपूर्वी ९२ ट्रक व तीन पोकलँड पकडून चार कोटी ३८ लाखांचा मुद्देमाला अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता. या कार्यवाहीमागील मुख्य कारण हे नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले आयपीएस जि. विजयकृष्ण यादव यांनी अमरावती येथील रेती व्यवसायिकांकडून लाखो रूपयांची लाच घेतल्यामुळे अडकले होते. याचा वचपा काढण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी ही राज्यामधील सर्वात मोठी कार्यवाही केल्याचे बोलले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी अमरावती-नागपूर महामार्गावर असलेल्या तिवसा पोलीस स्टेशनमध्ये तीन महिन्यासाठी आलेले परीवेक्षाधीन आयपीएस अधिकारी जि. विजयकृष्ण यादव यांनी २७ मार्च ते २५ जून या कार्यकाळात ३० हून अधिक मोठ्या कारवाया केल्या. यामध्ये सर्वात मोठी कारवाई म्हणजे १८० जनावरे, ५४ आरोपी व २० ट्रक तसेच अवैध रेतीची वाहतूक करणारे १५ ट्रक, १५ आरोपी तसेच १ कोटी ५० लाखाचा मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्यातील रेतीचा तस्कर म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीचेसुद्धा रेतीचे ट्रक पकडण्यात आले होते. त्याच रेती तस्कराने आयपीएस यादव यांच्यावर लाचलुचपत विभागाचा सापळा रचून लाखो रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या सर्व प्रकरणांमध्ये अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांची प्रतिमा राज्यभरात मलीन झाली होती. या सर्व बाबींचा वचपा काढण्यासाठी सध्या अमरावती जिल्ह्याला लाभलेले परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळ जिल्ह्यातून होणा-या अवैध रेती घाटावरून होणा-या ३२ ट्रकवर धामणगाव रेल्वे तालुक्याच्या हद्दीमध्ये राज्यामधील सर्वात मोठी कार्यवाही केली व दोन कोटींच्यावर रेतीसाठा जप्त केला. तसेच त्याआधी परतवाड्यावरून जाणारा देशी दारूचा टि. पी. वाहतुकीचा माल हा रासेगावला न जाता रेतीघाट परिसरात अवैध वाटप करत असताना पकडला. त्यामुळे दारू व्यवसायिकांनी चांगलाच धसका घेतला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यवाहीमुळे अमरावती ग्रामीण पोलिसांवर असलेला डाग पुसवून टाकल्याचे पोलीस विभागात बोलले जात आहे.

रेतीवाल्यांकडून सावध राहा !
याआधी आयपीएस अधिका-याने मोठी कारवाई केली म्हणून एसीबी विभागाने पोलीस अधिका-याची विकेट घेतली आहे तर आता राज्यामधली सर्वात मोठी कारवाई आहे. आता रेतीवले कोणाचा बळी घेणार, त्यामुळे रेतीवाल्यांकडून सावध राहण्याचा पोलीस विभागात या विषयाची चांगलीच चर्चा रंगत आहे.

Web Title: Will the stain of Amravati police be washed away by the 4.5 crores sand?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.