‘विक्रमशिला’ने उभारली पवनचक्की!
By admin | Published: November 23, 2014 11:12 PM2014-11-23T23:12:22+5:302014-11-23T23:12:22+5:30
पवनचक्कीची उभारणी करुन २००० वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला प्रकल्प पूर्ण करुन दारापूर येथील विक्रमशिला पॉलटेक्निकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
वीज निर्मिती : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची कमाल
संदीप मानकर - दर्यापूर
पवनचक्कीची उभारणी करुन २००० वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला प्रकल्प पूर्ण करुन दारापूर येथील विक्रमशिला पॉलटेक्निकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतापासून वीज निर्मितीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारचे वीज निर्मिती करण्यावर शासनाचा सुद्धा भर असतो. त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये अपारंपरिक वीज निर्मितीच्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु प्रात्यक्षिकाशिवाय कोणतेही तंत्रज्ञान समजणे अवघड असल्यामुळे येथील पॉलिटेकनिकचे प्राचार्य दीपक शिरभाते यांनी पवनचक्की निर्मितीचा प्रकल्प स्वत: राबविण्याचा निर्णय घेतला.
याकरिता मुंबई येथील सिको इंजिनिअरिंग कंपनीमार्फत आवश्यक तंत्रज्ञान प्राप्त झाले. पवनचक्कीची उभारणी विक्रमशिला तंत्रनिकेतनच्या परिसरात करण्यात आली.
या पवनचक्कीपासून निर्माण झालेली वीज साठवून ठेवण्याकरिता बॅटरीची व्यवस्था करण्यात आली आहे. या विजेचा उपयोग रात्री सुरक्षा देण्याकरिता करण्यात येत असून पवन चक्कीच्या उभारणीमध्ये मनीष खोडके, विभागप्रमुख उदय मेहरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पवनचक्की उभारणीकरिता विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान किंवा मार्गदर्शन लाभण्यासाठी त्यांनी संस्थेचे सचिव बाळकृष्ण अढाऊ व प्राचार्य दीपक शिरभाते यांना विद्यार्थ्यांनी भेटावे, असे संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. बाळकृष्ण अढाऊ यांचा या मोहिमेत सिंहाचा वाटा लाभला आहे. या मोहिमेचा लाभ नागरिकांना रात्रीच्या वेळी होत असल्याने नागरिकांनी ट्रस्टचे आभार व्यक्त केले आहे.