जिल्हा परिषदेत वाहू लागले कर्मचारी बदल्यांचे वारे, बदली वेळापत्रक जारी 

By जितेंद्र दखने | Published: March 28, 2023 07:41 PM2023-03-28T19:41:13+5:302023-03-28T19:41:13+5:30

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी बदल्यांचे अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने कर्मचारी बदली बाबतचे वेळापत्रक जारी केले आहे.

Winds of employee transfers started blowing in Zilla Parishad, transfer schedule released | जिल्हा परिषदेत वाहू लागले कर्मचारी बदल्यांचे वारे, बदली वेळापत्रक जारी 

जिल्हा परिषदेत वाहू लागले कर्मचारी बदल्यांचे वारे, बदली वेळापत्रक जारी 

googlenewsNext

अमरावती :

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी बदल्यांचे अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने कर्मचारी बदली बाबतचे वेळापत्रक जारी केले आहे. यानुसार येत्या १ एप्रिलपासून बदली पात्र कर्मचाऱ्यांच्यकडून संबंधित विभागप्रमुख मार्फत प्रस्ताव मागविलेले आहेत.जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्य बदल्यांची प्रक्रिया आगामी ३१ मे पूर्वी आटोपली जाणाऱ्या आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागप्रमुखांना लेखी पत्र पाठवून आगामी बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे बदली संदभार्तील अर्ज स्वीकारण्याची कारवाई सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांकडून बदलीचे प्रस्ताव २४ एप्रिल पर्यत स्वीकारण्याबाबत कळविले आहे.दरवर्षी जिल्हा परिषदेत कर्मचारी बदलीचा हंगाम मे महिन्यात सुरू होतो. त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने बदलीबाबतचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार आता बदली प्रक्रियेच्या चचेर्ला ही वेग आला आहे. या जिल्हा परिषदेच्या सर्वच विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या असून संबंधित विभागातील बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करून नियमानुसार बदली करण्यात येईल व त्या प्रक्रियेची तयारी आता लवकरच सुरू होत असून बदलीसाठी पात्र व इच्छुक कर्मचाऱ्यांनी हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेकांनी आपल्या पसंतीच्या जागी बदलीसाठी आतापासूनच चाचणी सुरू केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक अविश्यांत पंडा यांच्या नियंत्रणात ५ मे पासून प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.

असे आहे बदल्यांचे वेळापत्रक
१ ते २४ एप्रिल- कर्मचाऱ्यांचे अर्ज स्वीकारण
१० एप्रिल पर्यंत : सेवा विषय माहिती सादर करणे
५ ते १५ मे पर्यंत- जिल्हास्तरीय बदल्या करणे
१६ ते २५ मे पर्यंत- तालुकास्तरीय बदल्या करणे

आगामी कर्मचाऱ्यांच्य बदल्यांचे अनुषंगाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्य बदल्यांचे अनुषंगाने विभागप्रमुखांना आवश्यक सूचना दिलेल्या आहेत.येत्या मे महिन्यात बदल्याची प्रक्रिया राबविली जाईल.
- तुकाराम टेकाळे, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन विभाग

Web Title: Winds of employee transfers started blowing in Zilla Parishad, transfer schedule released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.