सहा दिवसांत एसटीचे अडीच कोटींचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:58+5:30

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या २,६५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना आहेत. काही कर्मचाºयांना गरजेनुसार बोलविण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी ‘लोकमत’ला दिली. अमरावती जिल्ह्यात आठ आगार, १४ बसस्थानक आहेत. एकूण ४०५ बसेस रस्त्यावर धावत होत्या. त्यामध्ये ४५ शिवशाही बसेसचाही समावेश आहे.

Within six days, ST's income of Rs 2.5 crore has plummeted | सहा दिवसांत एसटीचे अडीच कोटींचे उत्पन्न बुडाले

सहा दिवसांत एसटीचे अडीच कोटींचे उत्पन्न बुडाले

Next
ठळक मुद्देसूचना : चालक-वाहक, इतर कर्मचाऱ्यांनी घरीच राहावे

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रविवार २२ मार्च रोजी पुकारलेला जनता कर्फ्यू व त्यानंतर लागू झालेली संचारबंदी व आता २१ दिवसांकरिता संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याने सहा दिवसांपासून एसटीची चाके पूर्णता: थांबली आहे. दरदिवसाला एसटीचे ४० लाखांचे जिल्ह्यात उत्पन्न मिळते. त्यामुळे सहा दिवसांत दोन कोटी ४० लाखांचे एसटीचे उत्पन्न बुडाले आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या २,६५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना आहेत. काही कर्मचाºयांना गरजेनुसार बोलविण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी ‘लोकमत’ला दिली. अमरावती जिल्ह्यात आठ आगार, १४ बसस्थानक आहेत. एकूण ४०५ बसेस रस्त्यावर धावत होत्या. त्यामध्ये ४५ शिवशाही बसेसचाही समावेश आहे. बसने प्रवास करताना कुणालाही संसर्ग होऊ नये, याकरिता जनता कर्फ्युमुळे सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, देशात संचारबंदी लागू झाल्याने देशच 'लॉकडाऊन' करण्यात आल्याने सहा दिवसांपासून एसटीची चाकेसुद्धा थांबली आहेत.
जिल्ह्यात ८२५ चालक, ८७५ वाहकासह मॅकेनिकल आॅफिस कर्मचारी असे एकूण २,६५० कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणयाकरिता त्यांनी आपआपल्या घरीच राहावे, अशा सूचना एसटी महामंडळाने दिल्या आहेत. जिल्ह्यात ४०५ बसेसच्या एकूण २,४३० फेºया होत होत्या. त्याकरिता रोज ३० हजार लिटर डिझेल लागत होते. त्याकारणाने रोज १८ लाख ६० हजारांचे, तर सहा दिवसांत एक कोटी ११ लाख ६० हजारांचे डिझेल लागत होते. ते वगळता इतर उर्वरित एसटीचे उत्पन्न होते. मात्र, कोरोनामुळे त्या उत्पन्नावर महामंडळाला पाणी सोडावे लागत आहे.

‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता कर्मचाºयांना घरातच राहण्याच्या सूचना आहे. रोेज अंदाजे ४० लाखांचे उत्पन्न होते. सहा दिवसांत २ कोटी ४० लाखांचा फटका बसला. मात्र संपूर्ण देशच 'लॉकडाऊन'मध्ये असल्याने शासनाच्या आदेशाचे सर्वांगाने पालन करीत आहोत.
- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक अमरावती

Web Title: Within six days, ST's income of Rs 2.5 crore has plummeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.