शवविच्छेदन न करताच आदिवासीचा मृतदेह जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:35 AM2019-01-18T01:35:04+5:302019-01-18T01:35:34+5:30

अमरावती शहरातील नवसारी भागात डांबरीकरणाच्या कामावर गेलेल्या निमकुंड येथील आदिवासी मजुराचा मंगळवारी रोलरखाली मृत्यू झाला. त्यासंबंधी तक्रार न घेता परतवाडा पोलिसांनी दमदाटी केली तसेच शवविच्छेदन न करता मृतदेह जाळण्यात आल्याची तक्रार गुरुवारी अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

Without sacrificing an autopsy, the body of the tribal was burnt | शवविच्छेदन न करताच आदिवासीचा मृतदेह जाळला

शवविच्छेदन न करताच आदिवासीचा मृतदेह जाळला

googlenewsNext
ठळक मुद्देकंत्राटदारावर कारवाईची मागणी : नवसारीत रोलरखाली दबून इसमाचा मृत्यू

परतवाडा : अमरावती शहरातील नवसारी भागात डांबरीकरणाच्या कामावर गेलेल्या निमकुंड येथील आदिवासी मजुराचा मंगळवारी रोलरखाली मृत्यू झाला. त्यासंबंधी तक्रार न घेता परतवाडा पोलिसांनी दमदाटी केली तसेच शवविच्छेदन न करता मृतदेह जाळण्यात आल्याची तक्रार गुरुवारी अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
सुकलाल लाला दहीकर (३६, रा. निमकुंड, ता. अचलपूर) असे मृताचे नाव आहे, मागील काही दिवसांपासून आदिवासी मजूर अमरावती येथील दस्तुर नगर स्थित वीर हनुमान कंट्रक्शन कंपनीकडे रस्त्याच्या कामासाठी होते. १५ जानेवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास नवसारी परिसरात डांबरीकरणाचे काम सुरू होते. रोलरवर बसून असलेला सुकलाल दहीकर हा खाली कोसळून रोलरखाली आला. त्यात तो गंभीर जखमी झाला. संबंधित कंपनीचा सुपरवायझर साबळे व सहकारी उपचारासाठी दवाखान्यात नेत असतांना वाटेतच सुकलालचा मृत्यू झाला.
सुकलालच्या मृत्यूबाबत संबंधित कंपनीने पोलिसांत माहिती वजा तक्रार दिली नाही. तथापि, रुग्णवाहिका व अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये देऊन मृतदेह गावी पाठवून दिला. कंत्राटदार व पोलिसांनी संगनमताने पुरावे नष्ट केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी अंतुलाल संतु दहीकर व मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी गुरुवारी अचलपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकाºयांना दिलेल्या तक्रारीत केली.अमरावती येथे खंडेलवाल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामावर गेलेल्या निमकुंड येथील दीपक भुसूम या मजुराचा धर्मा (६) नामक मुलाचा जेसीबीखाली दबून ५ डिसेंबरला मृत्यू झाला.

प्रकरण अमरावती येथील असून, संबधित प्रकरणात ठाणेदारांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
- पोपटराव अबदागिरे, एसडीपीओ, अचलपूर

पोलिसांनी हुसकावून लावले
मृतदेह गावात आणल्यानंतर बुधवारी ५० ते ६० आदिवासी तक्रार देण्यासाठी परतवाडा पोलीस ठाण्यात गेले. मात्र, तेथे उपस्थित अधिकारी व संबंधित कर्मचाºयांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. तुम्ही प्रेत दफन न करता जाळून टाका, नाही तर तुम्ही अडचणीत याल. तुमच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा दम देत हाकलून लावल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: Without sacrificing an autopsy, the body of the tribal was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.