तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत दे, अन्यथा..! महिलेचा पाठलाग करून धमकी

By प्रदीप भाकरे | Published: May 22, 2023 05:04 PM2023-05-22T17:04:09+5:302023-05-22T17:04:27+5:30

वाहनाची चावी काढून घेतली, लग्नासाठी हेका

Woman chased and threatened in amravati,crime filed agains accused | तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत दे, अन्यथा..! महिलेचा पाठलाग करून धमकी

तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत दे, अन्यथा..! महिलेचा पाठलाग करून धमकी

googlenewsNext

अमरावती : मी तुझ्यावर १० हजार रुपये खर्च केले आहेत, ते पैसे परत दे, अन्यथा माझ्याशी संबंध ठेव, अशी गर्भित धमकी एका महिलेला देण्यात आली. शेगावपासून गणेशदास राठी विदयालयापर्यंत तिचा पाठलाग देखील करण्यात आला. २० मे रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपी विक्की बांडाबुचे (रा. अमरावती) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास ती महिला दुचाकीने मैत्रिणीकडे अभ्यासाकरीता जात होती. त्यावेळी आरोपी विक्की हा आपला शेगावपासून पाठलाग करत असल्याचे तिच्या लक्षात आले. कमलप्लाझा ते राठी विद्यालयादरम्यान तो अचानक तिच्यासमोर आला. तिला थांबवत त्याने तिच्या दुचाकीची चावी काढून स्वत:च्या खिशात ठेवली. तिला थांबवून मी तुझ्यावर १० हजार रुपये खर्च केले, ते तू मला परत दे, नाहीतर माझ्याशी संबंध ठेव अन्यथा मी तुला जीवाने मारून टाकेन, अशी धमकी तिला दिली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करतो, अशी धमकी देखील दिली.

म्हणून पळाला रोडरोमियो

अचानक घडलेल्या या घटनेने ती नखशिखांत हादरली. तिने धैर्य एकवटून जवळच्या नातेवाईकाला मोबाईल कॉल केला. ती आपबिती सांगू लागली. त्यावेळी तिने मोबाईल कॉल स्पिकरवर ठेवल्याने तिच्या नातेवाईकाचा आवाज आरोपीला ऐकू गेला. त्यामुळे तो तेथून निघून गेला. त्यानंतर तिने कसेबसे घर गाठले. तथा रात्रीच्या वेळी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांनी २१ रोजी पहाटे १.४४ च्या सुमारास तिची तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.

Web Title: Woman chased and threatened in amravati,crime filed agains accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.