टेंभुर्णी येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:44+5:302021-07-03T04:09:44+5:30

चांदूर रेल्वे : तालुक्यातील टेंभुर्णी येथे ६१ वर्षीय महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ...

Woman commits suicide by hanging at Tembhurni | टेंभुर्णी येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

टेंभुर्णी येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Next

चांदूर रेल्वे : तालुक्यातील टेंभुर्णी येथे ६१ वर्षीय महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. चंदाबाई अजाबराव वडस्कर (६२, रा. टेंभुर्णी असे मृत महिलेचे नाव आहे.

चंदाबाई अजाबराव वडस्कर या टेंभुर्णी गावातील अंगणवाडीत सेविका म्हणून काम करीत होत्या. त्या आपल्या मुलासोबत राहत होत्या. अशातच गुरुवारी रात्री मुलगा झोपल्यानंतर चंदाबाई वडस्कर यांनी घरातच नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वेचे पीएसआय गणेश मुपडे, अंमलदार आशिष राऊत यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात आणला होता. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.

Web Title: Woman commits suicide by hanging at Tembhurni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.