खात्यातून पैसे लांबवल्याची तक्रार देतानाच पुन्हा आला डेबिटचा मेसेज!

By प्रदीप भाकरे | Published: September 22, 2023 05:11 PM2023-09-22T17:11:24+5:302023-09-22T17:11:51+5:30

महिलेची १.२० लाखांनी फसवणूक : तीन बॅंक खात्यातून लांबविली रक्कम

woman duped by 1.20 lakh; Amount stolen from three bank accounts | खात्यातून पैसे लांबवल्याची तक्रार देतानाच पुन्हा आला डेबिटचा मेसेज!

खात्यातून पैसे लांबवल्याची तक्रार देतानाच पुन्हा आला डेबिटचा मेसेज!

googlenewsNext

अमरावती : आपल्या बॅंक खात्यातून तब्बल ९५ हजार रुपये परस्पर डेबिट झाल्याने सायबर पोलीस ठाण्याची पायरी गाठून तक्रार नोंदविताना एका महिलेच्या खात्यातून त्याच वेळी पुन्हा दोनवेळा रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज आला. १६ सप्टेंबरच्या सकाळी ९.२७ मिनिट ते १७ सप्टेंबरच्या दुपारी १.५५ या कालावधीत त्या महिलेच्या खात्यातून तब्बल १ लाख १९ हजार ९०० रुपये डेबिट झाले. विशेष म्हणजे त्या महिलेच्या तीनही बॅंक खात्यावर सायबर भामट्याने डल्ला मारला.

याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी रात्री अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिलेचे तीन वेगवेगळ्या बँकेत बचत खाते आहे. तिन्ही खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे. त्या सर्व व्यवहार ऑनलाईनच करीत होत्या. दरम्यान १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.२७ च्या दरम्यान त्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर सेन्ट्रल बॅक ऑफ इंडीया या बॅंक खात्यातून ९५ हजार रुपये काढल्याचा मॅसेज आला. अज्ञात इसमाने ते काढल्याचे लक्षात आल्याने त्यांनी लगेच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांना त्यांच्या तक्रारीचा ॲकनॉलेजमेंट नंबर देखील आला.

सायबर ठाण्यात असताना धडकला मेसेज

दरम्यान त्याच दिवशी दुपारी १.४२ ते १.५५ दरम्यान त्यांच्या मोबाईलवर ॲक्सिस बॅंक खात्यातून टप्याटप्याने १ रुपया, ७,७०० रुपये, दोेनदा ५ हजार रुपये व १,९९९ रुपये असे एकुण १९ हजार ७०० रुपये काढल्याचे एका मागून एक मेसेज येत गेले. त्यामुळे ती महिला पुन्हा तक्रार देण्याकरिता सायबर पोलीस ठाण्यात गेली. ठाण्यात असतानाच त्यांच्या मोबाईलवर पुन्हा एसबीआयच्या खात्यातून ऑनलाईन ५ हजार २०० रुपये काढल्याचा मॅसेज आला. त्याचवेळी त्यांनी परत ऑनलाईन तक्रार नोंदविली. २ लाखांच्या आत फसवणूक असल्याने त्या तक्रारी गुन्हा दाखल करण्यासाठी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पाठविण्यात आल्या. 

Web Title: woman duped by 1.20 lakh; Amount stolen from three bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.