घरगुती वादातून महिलेवर चाकुहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:15+5:302021-01-20T04:15:15+5:30
अमरावती : घरगुती वादातून आरोपींनी महिलेवर चाकूने वार करून तिला जखमी केले. दुसऱ्या गटाकडून एका युवकाच्या डोक्यावर काठीने मारून ...
अमरावती : घरगुती वादातून आरोपींनी महिलेवर चाकूने वार करून तिला जखमी केले. दुसऱ्या गटाकडून एका युवकाच्या डोक्यावर काठीने मारून जखमी करण्यात आले. ही घटना लालखडी येथील वाॅटर सप्लाय येथे सोमवारी रात्री घडली. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रांनुसार, शरीफ बेग रशीद बेग (२४, रा. लालखडी) याच्या तक्रारीवरून आरोपी सै.शहीद ,सै इम्रान, पीरू (सर्व रा. लालखडी) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, शरीफ बेगचा धाकटा भाऊ त्याच्या पत्नीला भेटायला गेला होता. येथे वाद झाल्याने त्याला आरोपींनी संगनमत करून दंड्याने डोक्यावर मारले तसेच त्याच्या बहिणीवर चाकूने हल्ला चढविला. दुसरीकडे सैयद इम्रान सैयद पाशा (२४) याच्या तक्रारीवरून आरोपी अहमद बेग रशीद बेग(२८), मोहम्मद बेग रशीद बेग (२२), शरीफ बेग रशीद बेग (२४) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर आरोपींनी सैयद इम्रान याच्या डोक्यावर काठीने मारहाण करून जखमी केले. पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करीत आहेत.