देशी दारू दुकानाविरोधात महिला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:41 PM2018-12-19T22:41:07+5:302018-12-19T22:41:24+5:30

स्थानिक कठोरा मार्गावरील रंगोली लॉनमागे संत गाडगेबाबा मंदिराजवळील देशी दारूचे दुकान तातडीने बंद करण्याची मागणी नगरसेविका सुचिता बिरे यांच्या नेतृत्वात महिला व नागरिकांनी बुधवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

Women aggressor against the country's liquor shops | देशी दारू दुकानाविरोधात महिला आक्रमक

देशी दारू दुकानाविरोधात महिला आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दुकान हटविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक कठोरा मार्गावरील रंगोली लॉनमागे संत गाडगेबाबा मंदिराजवळील देशी दारूचे दुकान तातडीने बंद करण्याची मागणी नगरसेविका सुचिता बिरे यांच्या नेतृत्वात महिला व नागरिकांनी बुधवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
महापालिका प्रभाग क्र. १ मध्ये रंगोली लॉनमागील बाजूला असलेल्या संत गाडगेबाबा मंदिरालगतचे देशी दारूचे दुकान बंद करावे किंवा येथून स्थलांतर करावे, अशी मागणी कित्येक वर्षांपासून जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागाकडे संत गाडगेबाबा मंदिर विश्वस्तांसह नागरिकांनी वारंवार निवेदनाद्वारे केली. तसेच नगरसेविका सुचिता बिरे यांनीही प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. मात्र, आश्वासनेच देण्यात आली. त्यामुळे नगरसेविकेसह या भागातील महिला व नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
सध्या संत गाडगेबाबा यांचा ६२ वा पुण्यतिथी महोत्सव १४ ते २१ डिसेंबरपर्यत या परिसरात साजरा केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी गाडगेबाबा मंदिरात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे. येथे मद्यपीची गर्दी होत आहे. वाढत्या समस्येमुळे महिला, मुली, ज्येष्ठ नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. गाडगेबाबा मंदिराचे विश्वस्त, स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता सदर देशी दारूचे दुकान बंद करावे, अथवा स्थलांतर करावे, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नगरसेविका सुचिता बिरे, पुष्पा देशमुख, अजाबराव होले, सुनंदा जयस्वाल, स्मिता बर्वे, कविता महल्ले, वैशाली भोवाडू, वंदना खराटे, मंगला काळमेघ, ज्योस्त्ना शेडके, कल्याणी कावरे, वैशाली बुरघाटे, संध्या वैद्य, ज्योती मुंदाने, शालीनी काकड, मीना दाभाडे, वंदना बोरकर, सरोस्वती टिंगणे, ज्योती मेश्राम, विमला बोरकर, अरूणा खानंदे, सरोजनी भडापार, ज्योती चौधरी, गौरी पाटील, शालिनी लंगडे, नीलिमा पाटील, शारदा ढवले, कल्पना कोहळे, अर्चना ठाकरे, दीपाली रंगारकर, किरण कावरे, हर्षा बेनोडकर, सविता बाबंलकर, आकाश तायडे, शाम देशमुख आदींनी दिला आहे.

Web Title: Women aggressor against the country's liquor shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.