देशी दारू दुकानाविरोधात महिला एकवटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:35 PM2018-01-17T23:35:35+5:302018-01-17T23:35:57+5:30
कठोरा मार्गावरील रंगोली लॉनमागील गाडगेबाबा मंदिरा लगतचे देशी दारूच्या दुकानामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे ते दुकान त्वरित स्थलांतरित करावे, अशी मागणी बुधवारी श्री संत गाडगेबाबा संस्था व महिलांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाव्दारे केली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : कठोरा मार्गावरील रंगोली लॉनमागील गाडगेबाबा मंदिरा लगतचे देशी दारूच्या दुकानामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे ते दुकान त्वरित स्थलांतरित करावे, अशी मागणी बुधवारी श्री संत गाडगेबाबा संस्था व महिलांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाव्दारे केली आहे.
सदर देशी दारुच्या दुकानामुळे महिला, मुली व नागरिकांना मद्यपींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ते दुकान हटविण्यासाठी नागरिकांनी अनेकदा निवेदने दिलीत. मात्र उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे ते दारूचे दुकान स्थलांतरित करण्याची मागणी या महिलांनी केली आहे. यावेळी रत्नप्रभा क्षीरसागर, कल्पना तायवाडे, रंजना दंडाळे, नगरसेविका सुचिता बिरे, सुषमा बर्वे, प्रेमा लव्हाळे, नीता सवाई, कल्पना ढोके, मेघा बोबडे, शारदा ढवळे, सरोज अवघड, सिंधू सरदार, शीला वनवे, मेघा काळमेघ, प्रणिता भुस्कटे, सुलभा बोरेकर, लेवटकर, सुजाता नवले आदी उपस्थित होत्या.