पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:09 AM2021-01-01T04:09:22+5:302021-01-01T04:09:22+5:30
राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणातील निष्कर्ष अमरावती : मागील पाच वर्षात रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात तीव्र ...
राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणातील निष्कर्ष
अमरावती : मागील पाच वर्षात रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात तीव्र रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे नुकताच राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पुरुषांच्या तुुलनेत महिलांमध्ये तीव्र रक्तदाबाचे प्रमाण जास्त आहे. सन २०१९-२० च्या राष्ट्रीय कुटुंब सवेक्षणानुसार जिल्ह्यात १९.८ टक्के महिलांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण १८.८ टक्के आहे. मागील पाच वर्षात महिलांमध्ये तीव्र रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे.
बॉक्स
रक्तदाब वाढण्याचे कारण
अनेकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या ही आनुवंशिक असू शकते. त्याचसोबत मद्यपान, मिठाचे जास्त प्रमाणात सेवन करणे, जेवण करून आराम करणाऱ्या किंवा एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण वाढते.
बॉक्स
काय काळजी घ्यावी?
उच्च रक्तदाब होऊ नये किंवा तो नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे, तसेच योग्य वजन कायम ठेवणे, वाढलेले वजन घटविणे, नियमित व्यायाम, योग करणे, मीठ खाण्याचे प्रमाण कमी करणे आदींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
बॉक्स
रक्तदाबाचे प्रमाण (टक्क्यात)
महिला पुरुष
सौम्य रक्तदाब १०.९ १२.०
मध्यम रक्तदाब ४.८ ४.१
तीव्र रक्तदाब १९.८ १८.७
कोट
उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी नियमित संतुलित आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. हेल्थ इन्डेक्सनुसार वजन नियंत्रित ठेवल्यास उच्च रक्दाबावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल.
उच्च रक्कदाबाच्या रुग्णांना आरोग्य केंद्र व रुग्णालयातून माेफत औषधी पुरविली जातात.
डाॅ. दिलीप रणमले
जिल्हा आरोग्य अधिकारी