अमरावतीच्या उपवनसंरक्षकांवर महिला आरएफओंचे गंभीर आरोप, वन विभागात खळबळ
By गणेश वासनिक | Published: February 15, 2024 05:44 PM2024-02-15T17:44:02+5:302024-02-15T17:44:24+5:30
दीपाली चव्हाण प्रकरणाची आठवण झाली ताजी; राज्याच्या वनबलप्रमुखांसह राज्य महिला आयोगाकडे तक्रार
अमरावती : गत दोन वर्षांपूर्वी मेळघाटच्या हरिसाल येथील आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वनविभागात धरणीकंप झाल्यानंतर आता अमरावतीच्या एका महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने अमरावतीचे उपवनसंरक्षक यांच्यावर तक्रार गंभीर तक्रारीचा बाॅम्ब टाकला आहे. तब्बल दहा पाणी तक्रारीत उपवनसंरक्षकाचे कारणामे उघड केले आहेत. याप्रकरणी राज्याचे वनबल प्रमुख काय ॲक्शन घेतात? याकडे वनविभागाचे लक्ष लागले आहेत.
अमरावतीचे उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा हे अवघ्या आठ महिन्यापूर्वी पदस्य झालेले असून एका महिला आरएफओने त्यांचेवर
गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहे. मिश्रा यांच्या तुघलकी आणि ‘यूपी राज’ कारणाने संबंधित महिला वनाधिकाऱ्याने तक्रारीत उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती येथे २१ महिन्यापूर्वी संबंधित महिला आरएफओ पदस्य असून त्यांचा गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी अमरावतीच्या मुख्यवनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांना भेटून आरएफओंच्या शिष्टमंडळाने तक्रारीची दखल घेऊन उच्चस्तरीय चाैकशी करण्याचा आग्रह धरलेला आहे. डीएफओ मिश्रा यांच्याकडून मिळणारा मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीची तक्रार या महिला आरएफओंनी राज्य महिला आयोगाकडे पाठविली आहे.
बंगल्यावर साहित्य पुरवठा करण्याचे फर्मान
उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांच्या बंगल्याची सध्या डागडुजी सुरु असून या बंगल्यावर नियमबाह्य, अंदाजपत्रक मंजूर नसताना लाखो रुपयांची उधळपट्टी केल्या जात आहे. बंगल्यावर फर्निचर, साफसफाई साहित्य, मशरुम गार्डनसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी उपवनसंरक्षक दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. वडाळीच्या वनविश्राम गृहावर मित्रांकरीता ‘नॉन व्हेज’ जेवण करण्यास सांगितले जाते. जेव्हा शासकीय वनविश्राम गृहात ‘नॉन व्हेज’ निर्बंध असताना एका महिला वनाधिकाऱ्यास भाग पाडले जाते, असे तक्रारीत म्हटले आहे.
वनाधिकाऱ्यांना एकट्याने भेटण्याचा सल्ला
उपवनसंरक्षक मिश्रा यांच्या कार्यक्षेत्रात एकूण ५ वनपरिक्षेत्र असून दोन वनपरिक्षेत्रात महिला वनाधिकारी कार्यरत आहेत. यापूर्वी एका महिला वन अधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षकाच्या कार्यशैलीवर नाराज होत दीपाली चव्हाण सारखे करण्याची भाषा वापरली होती. तेव्हा
उपवनसंरक्षक मिश्रा यांनी सर्वच आरएफओंच्या सर्व्हिस रिव्हाॅवर काढून जमा केल्या होत्या, ही बातमी ‘लोकमत’ने प्रकाशीत केली होती. पाच वनपरिक्षेत्र अधिकारी जेव्हा उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांना कामानिमित्य भेटण्यासाठी गेले असता केवळ एकट्याने भेटण्यास यावे असे सांगण्यात आले. त्यामुळे एकट्याने भेटण्याचा आग्रह का? असा गंभीर प्रश्न महिला वनाधिकाऱ्यांनी तक्रारीत नमूद केला आहे.
विमान, हॉस्पिटलचे भाडे दिले
अमरावतीचे उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. ते जेव्हा त्यांचे लखनऊ येथे गावी जातात. त्या विमानाच्या प्रवासाचे भाडे खर्च करण्यास सांगतात. इतकेच नव्हे तर ते काही दिवसांपूर्वी ते डेंंग्यूमुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात असताना येथील सर्व खर्च तक्रारकर्त्या महिला अधिकाऱ्याने केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अद्यापपर्यंत महिला आरएफओंकडून तक्रार प्राप्त झाली नाही. परंतु,डीएफओ मिश्रा यांच्याविषयी नेमके काय प्रकरण आहे, याची शहानिशा केली जाईल. यातील वास्तविकता जाणून पुढे निर्णय घेण्यात येईल.
- शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र