एसडीओ कार्यालयावर धडकल्या महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 10:16 PM2018-09-07T22:16:57+5:302018-09-07T22:17:26+5:30
अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांतील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसाही चोऱ्या, लूटपाट, महिला-मुलींची छेड काढणे, अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. हे रोखण्यासाठी शहर रात्री ११ नंतर बंद करा. पंधरा दिवसांत या सर्व बाबींची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध महिला संघटनांनी शुक्रवारी उपविभागीय अधिकाºयांना निवेदनाद्वारे दिला. याप्रसंगी पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांतील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसाही चोऱ्या, लूटपाट, महिला-मुलींची छेड काढणे, अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. हे रोखण्यासाठी शहर रात्री ११ नंतर बंद करा. पंधरा दिवसांत या सर्व बाबींची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध महिला संघटनांनी शुक्रवारी उपविभागीय अधिकाºयांना निवेदनाद्वारे दिला. याप्रसंगी पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
शहरात मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. महिलांना घराबाहेर एकटे पडणे मुश्कील झाले आहे. सोनसाखळी मंगळसूत्र पळवून नेण्याच्या घटना वाढल्या असून, चोरटे दिवसाही घरांना निशाणा बनवित आहेत. मुलींसह महिलांची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहे. सात-आठ महिन्यांपासून महिलांमध्ये दहशत पसरली असून बाहेर निघणे कठीण झाले. चौकाचौकांत असामाजिक तत्त्व नाहक त्रास देतात. धूम स्टाइलने दुचाकी चालविणे, तोंडाला रुमाल बांधून मंगळसूत्र हिसकावून पळ काढणे आता नित्याची बाब झाली आहे. सबब, १५ दिवसांत कारवाई करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. निवेदन देताना अपर्णा देशमुख, सीमा थोरात, माजी नगराध्यक्ष संगीता वैद्य, सोनाली पाटील, नगरसेविका किरण मालू, अक्षरा लहाने, रीना जयस्वाल, अपर्णा रोडे, किरण ठाकरे, मीनाक्षी मालू, सुनीता शेळके, ज्योत्स्ना देशमुख, विद्या शेळके, विभा बूब, सुनंदा गुडदे, मुक्ता पाटील, संगीता नरेडी, ममता अग्रवाल, सविता शहा, नीलिमा मुळे, प्रीती ठाकरे, दीपाली विधळे, किरण चव्हाण, स्वाती विधळे, तारकेश्वरी चिखले, सुशीला कडू, छाया पांडे, अश्विनी वाडेगावकर, मंगला लड्डा, भारती राऊत, कुसुम राऊत, भारती गुजर, छाया अग्रवाल, ज्योती राठी, साक्षी बरडिया आदींसह महिलाशक्ती होती.
हे करा उपाय; महिला संघटनांचा सल्ला
जुळ्या शहरात किती आॅटोरिक्षा आहेत, कितींना परवानगी आहे, याची तपासणी करा. आॅटोरिक्षाचालकांना ड्रेसकोड द्या. पीयूसीची तपासणी करा. अचलपुरातील डॉ.राठी ते बसस्थानक मार्गावरील वाहनांवर कारवाई करा. शहरात सीसीटीव्ही कॅमेरा, ज्या नागरिकांनी स्वत:चे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, त्यांना एक कॅमेरा रस्त्याच्या बाजूने लावण्यास विनंती करा. शहरातील स्पीड ब्रेकरची संख्या वाढवा.अशा मागणी वजा सल्ला देण्यात आला.