टाकरखेडा संभू येथे महिलांची शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:15 AM2021-08-26T04:15:39+5:302021-08-26T04:15:39+5:30
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात महिला शेतीशाळेचे आयोजन कृषी ...
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात महिला शेतीशाळेचे आयोजन कृषी सहायक रूपाली ठाकरे यांनी केले. खरीप हंगामापासून जमीन तयार करणे, बियाण्याला बीजप्रक्रिया व त्याचे महत्त्व, निंबोळी अर्क तयार करणे, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन या विषयांवर यापूर्वी झालेल्या शेतीशाळेत ही माहिती देण्यात आली.
आजच्या शेतीशाळेमध्ये कृषी परिसंस्थाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांचे दोन गट करून त्यांना कृषी पीक परिसंस्थाचे चित्रीकरण व सादरीकरण करण्यास सांगितले. यामध्ये गावातील शेतीशाळेतील महिला शेतकरी कल्याणी सवई व प्रीती पाटील यांनी कृषी पीक परिसंस्थेचे सादरीकरण केले. रूपाली ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. सदर शेतीशाळेला गावातील महिला उपस्थित होत्या.
250821\img-20210825-wa0080.jpg
टाकरखेडा संभू येथे महिलांची शेतीशाळा