पाण्यासाठी महिलांचा तिवसा नगरपंचायतीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:13 AM2021-04-09T04:13:51+5:302021-04-09T04:13:51+5:30

फोटो पी ०८ तिवसा तिवसा : शहरात एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची समस्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील विविध प्रभागांतील महिलांनी ...

Women's march for water at Tivasa Nagar Panchayat | पाण्यासाठी महिलांचा तिवसा नगरपंचायतीवर मोर्चा

पाण्यासाठी महिलांचा तिवसा नगरपंचायतीवर मोर्चा

Next

फोटो पी ०८ तिवसा

तिवसा : शहरात एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची समस्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील विविध प्रभागांतील महिलांनी बुधवारी दुपारी नगरपंचायतीवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी महिलांनी नगरपंचायत प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला.

येथील काही प्रभागांमध्ये चांगल्याप्रकारे पाणीपुरवठा होत असताना मोजक्याच काही ठिकाणी १५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. अधिकारी व पाणीपुरवठा प्रमुखांच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बाजारपेठ येथील मुख्य रस्त्यालागत पशु दवाखान्याजवळ पाईपलाईन फुटल्याने प्रभाग क्रमांक ९ येथील पाणीपुरवठा बंद आहे. फुटलेल्या पाईप लाईनवर प्रशासनाचे दुर्लक्ष असून येथील दुरुस्तीचे कामसुद्धा करण्यात आलेले नाही. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी मोर्चा काढून येत्या पाच दिवसांत जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आक्रमक पवित्रा घेत नगरपंचायत कार्यालयासमोर घागर आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. माजी सरपंच धनराज थूल, माजी नगरसेवक भूषण यावले, काम्युनिष्टचे दिलीप शापामोहनसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Women's march for water at Tivasa Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.